Categories: मनोरंजन

कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ हि नवीकोरी मालिका उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला

टीम लय भारी

Bhagya Dile Tu Mala : विराट एंटरटेनमेंट निर्मित कलर्स मराठीवर ‘भाग्य दिले तू मला’ (Bhagya Dile Tu Mala) ही मालिका उद्या पासून (४ मार्च रोजी) दररोज रात्री ९.३० वाजता पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तन्वी मुंडले (Tanvi Mundle) आणि विवेक सांगळे (Vivek Sangle) मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ ‘रत्नमाला’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

‘भाग्य दिले तू मला’ (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेचा प्रोमो पाहता हळुवार प्रेमाची गोड गोष्ट दाखवण्यात येत आहे. त्याला नाविन्याची कास तर तिला संस्कृती जपण्याचा ध्यास, कसा होईल त्यांचा एकत्र प्रवास? असे म्हणत मालिकेचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. संस्कृतीला आणि परंपरेला धरून राहणाऱ्या व्यक्तीला वेडं ठरवणाऱ्या या जगात जेव्हा एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नावीन्याची कास असणारा राजवर्धन जेव्हा एकेमकांसमोर येतात तेव्हा काय घडेल ?, याचे उत्तर देणारी ‘भाग्य दिले तू मला’ (Bhagya Dile Tu Mala) ही नवी मालिका कलर्स मराठीवर दाखल होत आहे.

यानिमित्ताने बोलताना कलर्स मराठीचे (वायकॉम १८) व्यवसाय प्रमुख अनिकेत जोशी म्हणाले, ‘‘कलर्स मराठी नव्या वर्षांत प्रेक्षकांसमोर साचेबध्द मालिकांव्यतिरिक्त वेगळय़ा धाटणीच्या, आशयघन कथानक असलेले विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. नाविन्यतेबरोबरच प्रत्येक मालिका, मालिकेतील पात्र हे मराठी मनाशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले राहील याची आम्ही जबाबदारी घेऊ. ‘‘भाग्य दिले तू मला’’ (Bhagya Dile Tu Mala) ही मालिका या बदलाची सुरुवात आहे.

हे सुध्दा वाचा :

Tanvi Mundle and Vivek Sangle starrer ‘Bhagya Dile Tu Mala’ to

प्रीती झिंटा झाली आई, वयाच्या ४६ व्या वर्षी दिला दोन जुळ्या मुलांना जन्म

Jyoti Khot

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago