मनोरंजन

Breath Into The Shadow S2 : ‘या’ दिवशी प्राइम व्हिडिओचा ‘ब्रीद: इनटू द शॅडो’ सीझन 2 येणार!

प्राइम व्हिडिओचा ओरिजनल बहुप्रतिक्षित सीरीज ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’चा नवा सीजन 9 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अनोख्या ट्विस्ट टर्नने खच्चून भरलेल्या या सायकॉलॉजिकल-थ्रिलरमध्ये अभिषेक बच्चन आणि अमित साध पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिरीजमध्ये नित्या मेनन, सैयामी खेर आणि इवाना कौर त्यांच्या भूमिकांची पुनरावृत्ती करताना दिसणार असून, आपल्या ऍक्शन सिक्वेन्ससह ही सीरीज दर्शकांचे नक्कीच मनोरंजन करेल.

हे सुद्धा वाचा

SBI Bank Users : एसबीआयच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी! आता ईएमआयमध्ये होणार वाढ

PM Jan Dhan Yojana : जन-धन योजनेतून आजवर 25 लाख कोटी रुपये वितरित केलेत! केंद्रीय मंत्र्याचे विधान

Yoga Tips : दुषित वातावरणाचा त्रास होतोय? ‘ही’ योगासने तुम्हाला फायदेशीर ठरतील

भारतातील प्राइम वीडियो ओरिजिनल्सच्या मुख्य अपर्णा पुरोहित म्हणतात, “ब्रीद: इनटू द शॅडोज या थ्रिलरचा सिरीजचा नवीन सीझन प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत आहे. एखाद्या शोच्या यशाचा पुरावा म्हणजे जेव्हा प्रेक्षक नव्या सीझनची मागणी करू लागतात. कथाकारांची आणि कलाकारांची एक उत्कृष्ट टीमद्वारा तयार करण्यात आलेल्या या सस्पेन्सफुल थ्रिलरचा नवीन सीझन आशा आणि चिंतेने ओतप्रोत असून, दर्शकांचे मनोरंजन होईल. अबुदंतिया एंटरटेनमेंटशी आमचा दीर्घकाळ संबंध आहे, ज्यांच्यासोबत आम्ही अनेक शो आणि चित्रपटांमध्ये सहयोग केला आहे, परंतु ‘ब्रीद’ फ्रँचायझी नेहमीच खास असेल कारण ती पहिली होती. ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ सीझन 2 एक वेधक, सस्पेन्सफुल ड्रामा आहे ज्यामध्ये परिपूर्ण थ्रिलरचे सर्व पैलू असून, त्यांना उत्तम प्रकारे अंमलात आणले आहे.

विक्रम मल्होत्रा ​​आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, आठ भागांची ही अमेझॉन मालिका मयंक शर्मा यांनी सह-निर्मित आणि दिग्दर्शित केली आहे. दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत ब्रीद: इनटू द शॅडोजच्या नवीन सीझनचे सह-लेखन केले आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

10 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

11 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

12 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

13 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

13 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

13 hours ago