मनोरंजन

कलर्स मराठीचा नवीन शो ‘अबीर गुलाल’चा लक्षवेधी प्रोमो रिलीज

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स (Colors Marathi) मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झाली आहे. या नवीन बदलाची सुरुवात ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे करण्यात आली. कलर्स मराठी काही ना काही नवनवीन मनोरंजन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतच असते. नुकतीच ‘सुख कळले’ ही नवी मालिका रसिकजनांच्या भेटीला आली. ‘सुख कळले’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवी मालिका घेऊन आपल्यासमोर सज्ज झाली आहे. ‘अबीर गुलाल’,(अबीर गुलाल) असे या नव्या मालिकेचे  नाव असून काही दिवसांआधी या नव्या मालिकेचा टिझर रिलिज झाला.(Colors Marathi’s new show ‘Abir Gulaal’ promo out)

त्यामध्ये आपण दोन अनोळखी मुलींचे नशीब कसे एका रात्रीत बदलले, हे पाहिले. या दोघी आता मोठ्या असून या नव्या प्रोमोमध्ये तुम्हाला त्यांची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.

प्रोमोमध्ये सावळी मुलगी एका गोऱ्या कुटुंबियांच्या घरात तर, गोरी मुलगी सावळ्या, श्रीमंत घरात दिसून येत आहे. सावळ्या मुलीचे नाव श्री तर, गोऱ्या मुलीचे नाव शुभ्रा असून शुभ्रा तिच्या आईवडिलांची लाडकी आहे पण, ती त्यांच्या वर्णामुळे त्यांच्यासोबत वाईट वागत आहे तर, दुसरीकडे श्रीच्या घरात सगळे गोरे असून तिचे वडील तिला सावळ्या रंगामुळे वाईट वागणूक देत आहेत. श्रीचा स्वभाव मनमोकळा, निरागस आणि प्रेमळ तर, शुभ्राचा रागीट स्वभाव पाहायला मिळत आहे. काय आहे श्री आणि शुभ्राच्या नशिबात? जाणून घेण्यासाठी पाहा ‘अबीर गुलाल’. या मालिकेचा नवीन प्रोमो तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अथवा इंस्टग्राम किंवा फेसबुकवर पाहू शकता.

या मालिकेत पायल जाधव आणि गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘अबीर गुलाल’ या मालिकेत अजून कोणती स्टारकास्ट असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून मालिकेचा टिझर पाहून अनेकांना उत्सुकता लागली आहे. मालिकेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी पाहात राहा कलर्स मराठी.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

2 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

6 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago