मनोरंजन

‘फेसबुक गेम’ चित्रपटातून उलगडणार मर्डर मिस्ट्रीचा थरार

सोशल मीडियामुळे अनेकदा अडचणीत येण्याची शक्यता असते, इतकेच नव्हे काहींच्या जीवावर देखील बेतते. फेसबुक या सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे हाताळत ही मर्डर मिस्ट्री रचण्यात आली आहे. सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही पदर उलगडून दाखविणारा ‘फेसबुक गेम’ एक अनोखा खेळ? असा हा मर्डर मिस्ट्री असलेला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होत आहे

‘ललिता पवार प्रॉडक्शन फिल्म आर्ट’ प्रस्तुत आणि समीर पवार निर्मित, दिग्दर्शित ‘फेसबुक गेम’ या मर्डर मिस्ट्रीची कथा रंगवण्यासाठी मालिका विश्वाचा लाडका चेहरा, हँडसम अभिनेता अमित भानुशाली येणार आहे. ठरलं तर मग या मालिकेनंतर अमित ‘फेसबुक गेम’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. फेसबुक या सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे हाताळत ही मर्डर मिस्ट्री रचण्यात आली आहे. सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही पदर या चित्रपटातून उलगडणार आहेत. अमितसह या चित्रपटात गिरीजा जोशी, जयराज नायर, अनिकेत केळकर, संजय खापरे, संदेश जाधव हे कलाकार झळकणार आहेत.

हे सुद्धा वाचा 

महापालिकांच्या दोन हजार शाळांमध्ये सरकार व्यायामशाळा उभारणार; भाजपची मुंबई पालिकेची जोरदार तयारी

महिला आणि पुरुष थोडा फरक येतो; अदिती तटकरें विषयी बोलताना भरत गोगावले यांचे महिलांबाबत आपमानस्पद विधान

जिल्हे पिंजून काढा ! पडझड झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे मिशन

‘फेसबुक गेम’ या चित्रपटाची निर्मिती मानसी मापुस्कर, रुद्राश पवार यांनी केली असून चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि निर्माता अशी तिहेरी धुरा समीर पवार यांनी सांभाळली आहे. येत्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होणार आहे. ही मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

4 mins ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

14 mins ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

46 mins ago

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

3 hours ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

3 hours ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

16 hours ago