मनोरंजन

गदर 2 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गदर: एक प्रेमकथा हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला त्या काळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. गदर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग गदर 2 लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 1970 मधील भारत- पाकिस्तानच्या युद्धावर आधारित हा सिनेमा असणार आहे.

या टीझरची सुरुवात व्हॉईस-ओव्हरने होते.ज्यामध्ये एक महिला ‘दामाद है पाकिस्तान का’असं ती म्हणते. 1971 चा काळ सांगताना ती म्हणते की, तिला नारळ दे, टिकली लाव. अन्यथा यावेळी तो तिला हुंड्यात लाहोरला घेऊन जाईल.’गदर 2’चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. गदर 2 चं शूटिंग अहमदनगर, लखनऊ, पालमपूर या शहरांमध्ये झालं आहे. लखनऊतील मार्टिनीरी महाविद्यालयात पाकिस्तानच्या दृश्याचं चित्रीकरण केले आहे. तसेच इंदौर, मध्यप्रदेश आणि मांडू्मध्ये देखील गदर 2 चं शूटिंग झालं आहे. या सिनेमात तारा सिंह आणि त्याचा मुलगा चरणजीत यांच्या नात्यावर आधारलेला आहे. उत्कर्ष शर्मा हा मुलगा चरणजीतच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे सुध्दा वाचा :

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध पाकिस्तान या दिवशी येणार आमनेसामने

सीईटीचा निकाल जाहीर, २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल !

२० पोलिसांनी ४ वारकऱ्यांना एका खोलीत नेऊन बेदम मारले

गदर 2 हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. चित्रपट तयार करण्यासाठी 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर अभिनेता सनी देओलने चित्रपटासाठी 5 कोटींचे मानधन आकारले आहे.तर अमिषा पटेलने 2 कोटींचे मानधन आकारले आहे.

रसिका येरम

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

8 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

9 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

11 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

12 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago