मनोरंजन

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.‘मल्हार’ (Malhar) चे पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल ! ही कथा गुजरात प्रदेशामधील कच्छच्या ग्रामीण भागात घडत असून तीन वेगवेगळया कथा येथे घडताना दिसणार आहेत. ज्या एकमेकांशी संबंधित आहेत. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल, याची खात्री आहे.(‘Malhar’, presented by V Motion Pictures, is all set to hit the screens on May 31.)

‘मल्हार’चे निर्माते प्रफुल पासड असून या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, हृषी सक्सेना, बालकलाकार श्रीनिवास पोकळे, विनायक पोद्दार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य आणि रवी झंकाल प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल कुंभार यांनी केले आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणतात, “हा चित्रपट गावाकडील अनेक विषयांवर आधारित असून यात अनेक पात्रांचा समावेश आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी कथा आहे. मैत्री, प्रेम,विश्वास अशी भावनात्मक जोड प्रेक्षकांना यात बघायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक नवा अनुभव असेल असे म्हणायला हरकत नाही. ‘मल्हार’ला प्रेक्षक पसंती दर्शवतील याची मला खात्री आहे.”

टीम लय भारी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

10 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

11 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

11 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

12 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

13 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

13 hours ago