मनोरंजन

‘पांडू’ चित्रपट लवकरच टेलिव्हिजनवर पहायला मिळणार

टीम लय भारी
मुंबई : कॉमेडीचा धमाका असलेला ‘पांडू’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचा सर्वांजण चांगलाच आनंद लुटत आहेत. दरम्यान, आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आली आहे की, ‘पांडू’ला पाहण्यासाठी कोणाला कोठेही जाण्याची गरज लागणार नाही. कारण ‘पांडू’ लवकरच टेलिव्हिजनवर येणार आहे.( movie ‘Pandu’ will be seen on television soon)

विनोदवीर भाऊ कदम आणि कुशल बद्रिके त्यांच्या जोडीला हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सोबतीला हेमांगी कवी, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता माळी यांसारखे नावाजलेले कलाकार अशा स्टारकास्टने सजलेल्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘पांडू’ सिनेमाचा रविवारी ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर’ होणार आहे.

हे सुद्धा वाचा

महेश मांजरेकरांच्या ‘पांघरूण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

इंडिया गेटवरील नेताजींच्या पुतळ्याच्या वादावर जावेद अख्तर यांंची प्रतिक्रिया

किचन कल्लाकार या कार्यक्रमात लवकरच दिसणार हा अभिनेता

When Kangana Ranaut Shared Cottage With Shahid Kapoor & Called It A ‘Nightmare’, Saying “I Was Fed Up…”

‘पांडू’ चित्रपट येत्या रविवारी संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर सर्वांना पाहायला मिळणार आहे. पांडू या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे लोककलावंत आहेत. एक दिवस दोघांनाही मुंबईत हवालदाराची नोकरी मिळते. पांडू हा साधाभोळा, भाबडा तर महादू हा त्याच्या अगदी विपरीत चतुर आणि चाणाक्ष, दुनियादारी समजणारा.

मुंबईत आल्यावर पांडूंच्या आयुष्यात येते केळी विकण्याचा व्यवसाय करणारी डॅशिंग गर्ल उषा. आसपासच्या स्वार्थी आणि मतलबी दुनियेत पांडू सारखी भोळी आणि साधी माणसंही असतात या गोष्टीचं तिला कौतुकही वाटतं आणि याचमुळे ती पांडूच्या प्रेमातही पडते. दरम्यान, ‘पांडू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडुओने केली आहे. हा चित्रपट 3 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago