मनोरंजन

रणवीर-दीपिका आता क्रिकेटच्या मैदानावर घालणार धुमाकूळ!

टीम लय भारी

मुंबईँ: बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंह आणि बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण आता क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घालणार आहे. कारण ही जोडी आता आयपीएलमध्ये आपला संघ देणार आहे. त्यामुळे चित्रपट सुष्टीत या जोडीची क्रिकेटच्या मैदानावर चलती दिसणार आहे (Ranveer-Deepika to hit the cricket field now).

क्रिकेट आणि चित्रपटाचे नाते फार जुने आहे. सध्या सिनेसृष्टीत असे अनेक क्रिकटर्स आहेत ज्यांनी अभिनेत्रींची लग्न केले आहे. तर काही सेलिब्रेटींनी क्रिकेट संघ खरेदी केले आहेत. यात जुही चावला, शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीत आता रणवीर-दीपिका यांचे नावही सहभागी होणार आहे. रणवीर-दीपिका ही जोडी आगामी आयपीएलमध्ये एक नवा संघ खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात

अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी कोणत्याही प्रकारची शोधमोहीम राबवली गेली नाही; एनसीबीचे स्पष्टीकरण

रणवीर-दीपिका

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आयपीएलमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएलमध्ये ८ ऐवजी एकूण १० संघाचा समावेश केला जाणार आहे. याचाच अर्थ येत्या आयपीएलमध्ये दोन नवे आयपीएल संघ असणार आहेत. हे संघ नेमकं कोणते असतील? त्यांची नावं काय? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हे दोन संघ खरेदी करण्यासाठी लिलाव आयोजित केला जाणार असून यात अनेक मोठमोठे कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे.

अनेक कलाकार, व्यावसायिक हे क्रिकेट टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोललं जात आहे. यात रणवीर आणि दीपिकाचेही नाव समोर येत आहे. त्यांनी नुकतंच यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्या टीमबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही.

अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीने बजावले समन्स

Deepika Padukone, Ranveer Singh Set To Enter Bidding War For New IPL 2022 Team: Report

यंदा खेळाडूंचा लिलाव

दरम्यान २ नव्या आयपीएल टीमसोबत यंदा खेळाडूंचा लिलावही पुन्हा केला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूवर आगामी आयपीएलमध्ये पुन्हा बोली लावली जाणार आहेत. त्यामुळे जर रणवीर-दीपिका या जोडीने क्रिकेटचा संघ खरेदी केला तर ते जुही चावला, शाहरुख खान, प्रिती झिंटा यांच्या यादीत सहभागी होतील. यामुळे रणवीर आणि दीपिका आयपीएलमध्ये एक संघ खरेदी करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

6 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

9 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

10 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago