मनोरंजन

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’चे ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर जोरदार स्वागत

लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत.श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम करतात आणि ते लग्न करणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण आहे, तिचे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे, त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळं वळण मिळेल?(Siddharth Jadhav, Bhushan Pradhan’s ‘Lagna Kallol’ gets a grand welcome on Marathi OTT)

चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.

“नवा विषय आणि नवा आशय असणारा ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट आणि त्यातील भन्नाट कलाकार प्रेक्षकांचं भन्नाट मनोरंजन करीत आहेत. आम्ही या चित्रपटासोबतच येत्या काळात अनेक विविध आशय विषय असलेले मराठी चित्रपट घेऊन येणार असून प्रेक्षकांचं शाश्वत मनोरंजन करणार आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

15 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

16 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

16 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

19 hours ago