मनोरंजन

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा (The Great Indian Kapil Show’s) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’मधील स्टार्स राजकुमार राव-जान्हवी कपूर कपिलबरोबर दिसत आहेत. याशिवाय प्रोमोमध्ये अनिल कपूरसह फराह खान आणि बाकी स्टार्स देखील धमाल करताना दिसत आहेत.’द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या निर्मात्यांनी काल रोजी एक ट्रेलर शेअर केला आहे.(The promo of The Great Indian Kapil Show’s Mid season has been released.)

प्रोमोमध्ये कार्तिक आर्यनच्या बनावट लग्नाची आणि सानिया मिर्झा कपिल शर्माची खिल्ली उडवताना दिसत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला, आंतरराष्ट्रीय गायक एड शिरन हा कपिलबरोबर दिसतोय. यानंतर कार्तिक या शोमध्ये त्याच्या आईबरोबर एंट्री करताना दिसतो. व्हायरल प्रोमोत अनिल कपूर आणि फराह खान कपिलबरोबर धमाल करताना दिसत आहेत. याशिवाय या प्रोमोमध्ये जान्हवी आणि राजकुमार राव त्याचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ प्रमोशनसाठी येताना दिसतात. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 31 मे रोजी प्रदर्शित होत आहे. याशिवाय प्रोमोत राजकुमार कपिलच्या शोची प्रशंसा करताना दिसतो.

यानंतर प्रोमोमध्ये रॅपर बादशाह काही गाणे गाताना दिसतो. सानिया नेहवाल, सानिया मिर्झा आणि मेरी कोम देखील कपिलबरोबर शोमध्ये मजा-मस्ती करत आहेत. या प्रोमोमध्ये येणाऱ्या पाहुण्याची झलक दाखवण्यात आली आहे. कपिलचा हा शो हिट झाला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ अनेकांना आवडत आहे. या शोच्या प्रोमोला अनेकजण पसंत करत आहेत. दरम्यान, कपिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो नुकताच ‘क्रू’ या चित्रपटामध्ये तब्बू , करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉनबरोबर दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केलंय. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.

 

टीम लय भारी

Recent Posts

भुसावळ दुहेरी हत्याकांड : तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ येथील भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणी (double murder)…

9 hours ago

फिक्की व महाराष्ट्र चेंबरतर्फे शुक्रवार दि. ७ जून २०२४ रोजी पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधींवर चर्चासत्र

फिक्की व महाराष्ट्र चेंबरच्या पाठिंब्याने ARISE स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) च्या माध्यमातून पश्चिम आणि मध्य…

10 hours ago

कच्चं आलं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर

भारतात आल्याचा चहा खूप फेमस आहे. आलं (raw ginger) भाजीत सुद्धा टाकलं जातं. तुम्हाला माहित…

10 hours ago

आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त (World Anti-Tobacco Day) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी…

11 hours ago

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ मराठी चित्रपट,संत मुक्ताबाईचा जीवनपट येणार रूपेरी पडद्यावर

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा फार मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ,…

13 hours ago

पंतप्रधान पदासाठी माझी पसंती राहुल गांधी; मल्लिकार्जुन खरगे

देशामध्ये लोकसभा निवडणूक आज संपणार आहे, आज शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. तर बुधवारी…

13 hours ago