मनोरंजन

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) (Acid) चित्रपटाचा (Film) अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ३ मे २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.केरळमधील ॲसिड हल्ल्यातील गुन्हेगार राज्याच्या विविध भागातून बेपत्ता होतात.(The world digital premiere of the mysterious ‘Acid’ film that shook society!)

ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या मुलींच्या घरासमोर या गुन्हेगारांना त्यांच्या कापलेल्या लिंगासह टाकण्यात येते. या वारंवार घडणाऱ्या घटना समाजात व्हायरल होतात आणि लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देऊ लागतात. मात्र ही कृत्ये करणाऱ्या अज्ञात कोण आहे याचा सुगावा लागत नाही. नेमका कोण असेल हा अज्ञात, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपट हा मूळ मल्याळम भाषेत असून याचे मराठी रूपांतर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

“समाजात विक्षिप्त मानसिकतेचे लोक आणि त्यांचे विक्षिप्त कृत्य मनाला हेलावून टाकणारे असतात. समाजातील ही विक्षिप्तता दाखवणारा ‘ॲसिड’ (आघात) चित्रपट प्रेक्षकांना सादर करून जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

45 mins ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

1 hour ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago