मनोरंजन

व्हॅलेन्टाईन्स डे’ विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम, अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष गावडे आणि रूपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत ओटीटी प्रेक्षकांचे बेमालूम मनोरंजन करीत आहेत.व्यक्ती आवडणं. प्रेम व्यक्त करणं. प्रेमात बेधुंद होणं. वाट्याला विरह येणं. हे सगळं या चित्रपटात पहायला मिळणार असून या सर्व भावनांना आणखी ठळक करत, मनाचा ठाव घेणारी गाणी प्रेक्षकांना हळवं करीत आहेत. कष्टाळू आणि जबाबदार युवक ते निधीच्या प्रेमात वेडा झालेल्या विनयचा वेड्यांच्या इस्पितळात जाण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात पहायला मिळणार आहे.

“प्रेमाने जग जिंकण्याएवढी ताकत असते असं म्हणतात, अशाच प्रेमातून आजच्या युवकांना आयुष्यातील एक प्रेरणादायी धडा शिकवणारा चित्रपट ‘एक ती’ प्रदर्शित करताना मन हर्षित होत आहे. अशा प्रकारचे दर्जेदार चित्रपट ‘अल्ट्रा झकासवर’ संकलित करण्याचा आमचा कायम प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago