Categories: आरोग्य

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा (Ash Gourd ) हा वात-पित्त कमी करणारा, बुद्धी आणि बल वाढवणारा असा आहे. उन्हाळ्यात कोहळा (Ash Gourd ) खाल्याने पोट थंड राहण्यास मदत होते. बर्फाच्या तुकड्यासारखा दिसणारा कोहळा शरीरासाठी बर्फाप्रमाणेच काम करतो. कोहळामध्ये एक नाही तर अनेक औषधी गुणधर्म आढळतात. कोहळा उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.कोहळा खाल्याने उन्हाळ्यात पोटातील अल्सर, टाइप 2 मधुमेह, जळजळ आणि इतर अनेक आजार बरे करण्यास मदत करते. कोहळा पोटासाठी आणि पचनासाठीही चांगला मानला जातो.(Benefits of eating Ash Gourd (white petha) in summer)

आग्र्याची प्रसिद्ध मिठाई असलेली पेठा कोहळापासून बनवली जाते ही कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होते. ना खराब होण्याचा त्रास ना ते साठवण्यासाठी रेफ्रिजरेटरची गरज. त्यामुळे उन्हाळ्यात पेठा जरूर खा.

कोहळा खाण्याचे फायदे
पोट थंड ठेवते –कोहळा हा थंडगार आहे. ही एक अशी भाजी आहे ज्यापासून मिठाई अगदी सहज बनवता येते. कोहळापासून पेठा मिठाई म्हणजे रसाळ आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या पेठांमुळे पोट थंड राहते. पेठा उन्हाळ्यात अवश्य खावा.

पचनसंस्था सुधारते – कोहळा हा फायबरचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठता, पेटके आणि सूज असेल तेव्हा तुम्ही कोहळाचे ज्युस पिऊ शकता. यामुळे आतड्याचे आरोग्यही सुधारते.

लठ्ठपणा कमी करते- कोहळा हे खूप कमी कॅलरी असलेले अन्न आहे, ज्यामध्ये भरपूर पोषक आणि फायबर असते. कोहळा भाजी किंवा ज्यूस रोज प्यायल्यास वजन कमी होण्यासही मदत होते.

किडनी डिटॉक्सिफाय करते- कोहळा शरीरात साचलेली घाण काढून टाकण्याचे काम करतात. यामुळे किडनीमध्ये द्रवपदार्थाचा स्राव वाढण्यास मदत होते. कोहळा शरीराला डिटॉक्सिफाय करून हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

श्वसन प्रणाली सुधारते – कोहळामध्ये असे घटक असतात जे श्वसनमार्गामध्ये जमा झालेला कफ किंवा श्लेष्मा सहजपणे बाहेर टाकतात. कोहळा खाल्ल्याने श्वसनमार्ग स्वच्छ होतो. फुफ्फुस निरोगी ठेवण्यास मदत होते. ऍलर्जी झाल्यास कोहळा सेवन फायदेशीर ठरते.

टीम लय भारी

Recent Posts

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

2 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

4 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

4 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

5 hours ago

अपघातानंतर असा होता ऋषभ पंतचा रुटीन, या गोष्टींचे केले सेवन

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. त्यानंतर…

1 day ago

भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आरामात जिंकेल: मोहम्मद शमी

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चा वार्षिक पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला. कार्यक्रमात भारताचा स्टार…

1 day ago