आरोग्य

कंटेन्मेंट झोनमध्ये सभांना परवानगी नाही, सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या नव्या गाईडलाईन जारी

टीम लय भारी

नवी दिल्ली: आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेन्मेट झोन परिसरात आणि 5 टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेलल्या जिल्ह्यांमध्ये सभांना परवानगी देण्यात येणार नाही. तसेच ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपर्यंत कमी आहे, त्या ठिकाणी अटी आणि शर्तीवरच सभांना परवानगी देण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे (Covid guidelines issued by the Center on the backdrop of festivals).

सभांना परवानगी द्यायची की नाही हे राज्य ठरवतील. कोरोना संसर्गा संदर्भात दर आठवड्याला येणाऱ्या रिपोर्टच्या आधारे परवानगी देणे किंवा निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारे घेतील. संसर्गाची चिन्हे ओळखण्यासाठी राज्यांना दररोज जिल्ह्यांवर बारकाईने नजर ठेवावी लागेल, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.

नागपुरात दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रद्द, संघाचे शस्त्रपूजनही मर्यादित लोकांमध्ये, हे आहे कारण

एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त

प्रवास करणं टाळा

लोकांनी प्रवास करणं टाळावं आणि एकमेकांना भेटणं टाळावं यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ऑनलाईन दर्शन आणि व्हर्च्युअल समारंभांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याशिवाय नवरात्रीत पुतळ्याचं दहन, दुर्गा पूजा, मंडप, दांडिया आणि छठ पूजेसारखे कार्यक्रम प्रतिकात्मक झाले पाहिजे, असंही या नव्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रसाद देणं टाळा

ठरवून दिलेल्या संख्येनुसारच सभा किंवा मिरवणुका काढली जाते की नाही यावर लक्ष दिलं पाहिजे. तसेच प्रवेशाच्या ठिकाणी वेगळा प्रवेश असावा. प्रार्थनेसाठी चटाईचा उपयोग करण्यात येऊ नये. प्रसाद आणि पवित्र जल शिंपडणे आदीपासून बचाव केला पाहिजे, असंही नमूद करण्यात आलं आहे.

विमानतळ उद्घाटनाला विनायक राऊतांनी दिवसाचे २४ तास आणि वर्षांचे १२ महिने पाठपुरावा केला : सुभाष देसाई

Most active Covid cases in Navi Mumbai fall in 31-40 years age group

देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2.36 लाख

देशात आज 19,740 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 3,39,35,309 एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2,36,643 झाली आहे, ही संख्या गेल्या 206 दिवसातील सर्वात कमी आहे. संक्रमणाच्या एकूण संख्येच्या 0.70 टक्के ही संख्या आगहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आज कोरोनामुळे 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा हा आकडा 4,50,375 वर गेला आहे.

कालपर्यंतची आकडेवारी

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 38 लाख 94 हजार 312 वर गेला आहे. देशात कालपर्यंत 3 कोटी 32 लाख 258 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 49 हजार 856 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 44 हजार 198 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. कालपर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 92 कोटी 63 लाख 68 हजार 608 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

1 hour ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

1 hour ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

3 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

6 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

7 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

9 hours ago