आरोग्य

Covid19 : ‘टाळ्या वाजवणे, दिवे लावायला सांगणे हे पंतप्रधानांचे काम आहे का ?’

Covid19 : कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा रोग भाजपाला लागला आहे : थोरात

 

टीम लय भारी

मुंबई : देशात कोरोना विषाणूने ( Covid19 ) थैमान घातले असून देश एका गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. दिवे लावा, टाळ्या वाजवा असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नाही. त्यांनी आता तरी गंभीर व्हायला हवे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना थोरात पुढे म्हणाले की, कोरोनाचा ( Covid19 ) सामना करण्यासाठी डॉक्टर्स, मेडीकल स्टाफ, पोलीस यंत्रणेसह सर्वजण आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आवश्यक असलेली मदत करणे ही आजची गरज आहे.

जास्तीत जास्त प्रमाणात व्हेंटीलेटर्स उपलब्ध करणे, टेस्टींग लॅबची संख्या वाढवणे, डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांना आवश्यक असलेले कीट उपलब्ध करुन देणे तसेच राज्य सरकारना जास्तीत जास्त मदत करणे, नागरिकांना धीर देणे, त्यासाठी केंद्र सरकारकडून भरघोस आर्थिक मदतीबरोबर सर्व प्रकारचे सहाय्य देण्यास प्राधान्य देणे हे त्यांचे काम आहे. दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्यासारखे वागणार आहेत का ? असा सवालही थोरात यांनी केला आहे.

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात देशाला एका कणखर व जबाबदार नेतृत्वाची गरज असते. दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांकडे ते नाही. कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा एक रोगच त्यांना लागला आहे. याची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनासारख्या ( Covid19 ) राष्ट्रीय आपत्तीच्या वेळीही इव्हेंट करुन परिस्थीतीचे गांभीर्य घालवले जात आहे, असेही थोरात म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Corona : रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरोघरी दिवा लावूया

‘कोरोना’विषयक केंद्र सरकारने प्रसारित केलेली अधिकृत माहिती

तुषार खरात

Recent Posts

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

1 hour ago

नाशिक महापालिकेचा पाणी पुरवठ्यावर पाणीगळती रोखण्यासाठी स्काडामीटर बसवण्याचा प्रस्ताव

नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…

2 hours ago

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे डबक्यात पडून बहीण-भावाचा म़ृत्यू

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्र्यंबक भंडकर यांची धनश्री भंडकर (वय 4 ), आविष (5)…

2 hours ago

शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत माढा मध्ये रंगणार…

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…

2 hours ago

नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणी दोघांना अटक

सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…

2 hours ago

चक्क छगन भुजबळांच्या स्विय सहायकालाच पन्नास हजारांचा गंडा

येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal's personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला…

2 hours ago