आरोग्य

कढीपत्त्याची पानं फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही काळी पडतात? वापरा ‘या’ ट्रिक्स

आपण स्वयंपाक करताना पदार्थांना स्वाद आणि चव येण्यासाठी विविध प्रकारचे मसाले वापरतो. यामध्ये खड्या मसाल्यांसोबत कढीपत्त्याचा (Curry Leave) देखील वापर अधिक होत असतो. डाळ, पोहे, उपम्यासह अनेक भाज्यांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा (Curry Leave) वापर केला जातो. अनेकजण आपल्या परड्यात किंवा कुंडीमध्ये कढीपत्त्याचे (Curry Leave) झाड लावतात. त्यामुळं त्यांना ताजा कढीपत्ता मिळतो. पण काहीजणांना बाजारातून कढीपत्ता विकत आणावा लागतो. बाजारातील आणलेला कढीपत्ता(Curry Leaves) अधिक दिवस जाण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवला जातो. पण कधी कधी कढीपत्त्याची पानं फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही काळी पडतात. त्यामुळे अनेक गृहिणींना कढीपत्ता कसा फ्रिजव्ह करायचा? कढीपत्ता खूप दिवस कसा ताजातवाणा ठेवायचा? असं अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. त्यासाठी काही ट्रिक्स…(Curry Leaves Simple tricksTo Preserve)

कढीपत्ता जास्त दिवस साठवायचा असेल तर प्रथम तो नीट साफ करा, खराब झालेली किंवा किड लागलेली पानं काढून टाका. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

पानांमधील पाणी संपूर्ण नितळण्यासाठी सूती कापडावर थोडा वेळ पसरवुन ठेवा. त्यासाठी तुम्ही कोवळ्या उन्हात जरी ठेवलात तरी चालेल.

गुढी पाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खाल्ला जातो? जाणून घ्या

पानं व्यवस्थित सुकल्यानंतर तुम्ही ती हवाबंद डब्यात किंवा पिशवीत सहज साठवून फ्रिजमध्ये ठेवू शकता. अस केल्यास पानांना बुरशी लागणार नाही. यासोबत ती खूप दिवस ताजी टवटवीत राहतात.

कढीपत्याची पानं १ ते २ आठवड्यापर्यंत साठवण्यासाठी पेपर टॉव्हेलमध्ये गुंडाळूनही फ्रिजमध्ये ठेवू शकता.
कढीपत्त्याची सुकलेली पानं ताजी ठेवण्यासाठी तुम्ही डब्ब्यात लिंबू ठेवा. यामुळे कढीपत्त्याची पानं आठवडाभर हिरवीगार राहतात.

कढीपत्याचे फायदे

जेवणात कढीपत्ता वापरल्याने चव तर येतेच पण त्याचबरोबर रोजच्या आहारात त्याचा समावेश केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. रोज सकाळी कडीपत्ता खाल्ल्यास मॉर्निंग सिकनेस कमी होईल. तसंच, रिकाम्या पोटी कढीपत्ता चावून खाल्ल्यास यकृताचे आरोग्य सुधारते. कढीपत्ता खाल्यास पचनक्रियादेखील सुधारते. बद्धकोष्ठता, अॅसिडीटी आणि अपचन यासारख्या समस्या आराम मिळतो. तुम्ही दही किंवा ताकासोबत कढीपत्ता खाऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला नेमकं काय खावं?

कढीपत्त्यामुळं शरिरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळं वजन कमी करण्यास मदत होते. कढीपत्ता खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते.

मायग्रेन, डोकेदुखी, डायबिटीस, थायरॉईड, तोंडाचा अल्सर, वजन कमी करणे, हार्मोन्सचे असंतुलन अशा विविध समस्यांवर कढीपत्ता उपयुक्त असतो.

धनश्री ओतारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

8 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

8 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

9 hours ago