आरोग्य

उन्हाळ्यात उसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर

उन्हाळ्यात उसाचा रस (sugarcane juice) पिणे सर्वांनाच आवडते. हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी पिता येते. हे पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पण पिताना काही गोष्टी लक्षात ठेवा.उसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे ते पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण जेव्हाही तुम्ही उसाचा रस पितात तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. उसाच्या रसमध्ये फायबरचे प्रमाण सुमारे १३ ग्रॅम असते. १८३ कॅलरीज आणि ५० ग्रॅम साखर आहे. उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी पेय प्यायचे असेल तर उसाचा रस हा उत्तम पर्याय आहे. त्याचे अनेक गुण हे सर्वोत्तम पेय बनवतात. उसाचा रस पिण्याचे फायदे आणि ते पिण्याची पद्धत जाणून घ्या.(Drinking sugarcane juice in summer is beneficial for health)

हायड्रेटिंग ड्रिंक आहे उसाचा रस
उसाच्या रसामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स पोटॅशियम असतात. त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. उसाचा रस स्पोर्ट्स ड्रिंक म्हणून वापरता येतो. व्यायामानंतर आलेला थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस पिऊ शकतो. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे स्नायूंमध्ये ऊर्जा पुनर्संचयित होते.

अँटीऑक्सिडंटने समृद्ध
उसाचा रस प्रक्रिया केलेला नसतो आणि त्यात फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे हे एक आरोग्यदायी पेय आहे आणि ते प्यायल्याने कर्करोगापासूनही बचाव होतो.

लिव्हरसाठी आरोग्यदायी
उसाच्या रसामध्ये पोटॅशियम असते आणि ते शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स राखते. जे यकृताला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. कावीळ झाल्यास अनेकदा उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.

पचनशक्ती मजबूत करते
उसाच्या रसामध्ये थोड्या प्रमाणात फायबर असते. तसेच शरीराला हायड्रेट ठेवते. त्यामुळे शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता नसते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

किडनीसाठीही फायदेशीर
उसाच्या रसामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियम अजिबात नसते. त्यामुळे ते किडनीसाठीही आरोग्यदायी आहे. हे प्यायल्याने किडनी मजबूत होते. हे यूरिन पास करण्यासाठी मदत करते.

उसाचा रस पिण्याचे हे सुद्धा आहेत फायदे –
उसाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
उसाचा रस वजन कमी करण्यासाठी देखील उत्तम पेय आहे.
चयापचय वाढवण्याव्यतिरिक्त ते आतड्यांसंबंधी आरोग्य देखील सुधारते.

मधुमेही रुग्णांनी पिऊ नये उसाचा रस
उसाचा रस पिणे मधुमेही रुग्णांसाठी चांगले नाही. त्यात असलेल्या साखरेचे प्रमाण अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. म्हणून ते पिणे टाळणे चांगले आहे.

उसाचा रस पिण्याची योग्य पद्धत
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवाकर सांगतात की, उसाचा रस फ्रेश तयार केलेला प्यावा.उसाचा रस पिण्याची योग्य वेळ म्हणजे दुपार आहे. दुपारी ते पिणे चांगले.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

10 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

11 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

11 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago