आरोग्य

कच्चं आलं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर

भारतात आल्याचा चहा खूप फेमस आहे. आलं (raw ginger) भाजीत सुद्धा टाकलं जातं. तुम्हाला माहित आहे का आल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.आल्याचा वापर तुम्ही कशातही करू शकता. आल्याचं (raw ginger) सेवन तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता.या व्यतिरिक्त पुरुषांच्या आरोग्यासाठी आलं विशेष लाभदायी आहे. ब्लडप्रेशर, आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कच्च्या आल्यात (raw ginger) व्हिटॅमिन ए, डी, लोह, झिंक, आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं. तसंच कच्चं आलं (raw ginger) सेवन केल्यास सर्दी-खोकल्यासारखे संसर्गजन्य आजारही दूर ठेवता येतात. आले हे व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगनीजचा उत्कृष्ट स्रोत आहे. आलं अर्थात अद्रक हा पदार्थ त्यापैकीच एक होय. कच्चं आलं (Raw Ginger) अनेक आजारांवर गुणकारी आहे. ब्लड प्रेशर, पोटाशी संबंधित आजार किंवा मायग्रेनची समस्या असेल, तर कच्चं आलं (raw ginger) खाणं फायदेशीर ठरतं.(Eating raw ginger is beneficial for health)

पोटासाठी उत्तम –
पोटासाठी उत्तम असणाऱ्या आल्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या होत नाहीत.आल्यामध्ये एंजाइम असते. हे एंजाइम पचनसंस्था सुरळीत करते. आल्यामध्ये एंजाइम असतात जे पचनास मदत करतात आणि आले मळमळ आणि उलट्या कमी करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. आले खाल्ल्याने मासिक पाळीच्या क्रॅम्प्सची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

त्वचा निरोगी आणि चमकदार
आल्यात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी सुद्धा चांगले असते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. हे व्हिटॅमिन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. आल्यामुळे आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. व्हिटॅमिन सी चा हा चांगला स्रोत आहे.

सर्दी खोकला-
आल्याने सर्दी खोकला टाळला जातो. आले उग्र असते. आले तुम्ही चहात टाकू शकता त्याने घसा चांगला, क्लिअर होतो.

मधुमेहाचा धोका कमी-
आल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो कारण आल्याने साखरेची पातळी नियंत्रित होते. आल्यामुळे संधिवातापासून आराम मिळतो कारण यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

ताण तणाव कमी-
आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमचा मूड खराब असेक तुम्हाला कसला ताण असेल तर तुम्ही आल्याचा कडक चहा पिऊ शकता .

लैंगिक समस्या –
लैंगिक समस्या असलेल्या पुरुषांनी कच्चं आलं खाणं फायदेशीर मानलं जातं.
पुरुषांना लैंगिक समस्या असतील, तर त्यांनी कच्चं आलं खावं. यामुळे अशा समस्या दूर होण्यास मदत होते. कारण कच्चं आलं खाल्ल्यानं अनेक आजार बरे होतात.

कोलेस्टेरॉलची समस्या कमी-
कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कमी करण्यासाठी आल्याचं सेवन महत्त्वपूर्ण ठरतं. तुम्हाला कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर त्यावर कच्चं आलं गुणकारी आहे. आल्याच्या सेवनानं कोलेस्ट्रेरॉलची पातळी कमी होते. तसंच हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी कच्चं आलं खाणं फायदेशीर आहे.

टीम लय भारी

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

19 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

20 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

20 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

21 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

23 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

23 hours ago