दुबईहून आलेला अहमदनगरचा पुरुष करोना बाधित, एकूण रूग्ण ४८

टीम लय भारी

मुंबई : राज्यात आज दिवसभरात तीन करोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. नगर जिल्ह्यातील ५१ वर्षीय पुरुष करोना बाधित आढळला असून तो आपल्या पत्नीसह दुबईला गेला होता. त्याची पत्नी करोना निगेटिव्ह आढळली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, आज आरोग्यमंत्र्यांनी मुंबई विमानतळावर जाऊन तेथे सुरू असलेल्या स्क्रीनींग सुविधेची पाहणी केली.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील पुढीलप्रमाणे

पिंपरी चिंचवड मनपा ११
पुणे मनपा ८
मुंबई ९
नागपूर ४
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी ३
अहमदनगर २ ,
रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी १
एकूण ४८

राज्यात आज ७८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १३०५ प्रवासी आले आहेत.

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १०३६ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ९७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १३०५ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

आज दुपारी अडीचच्या सुमारास आरोग्यमंत्री टोपे यांनी मुंबई विमानतळावर जाऊन प्रवाशांच्या होत असलेल्या स्क्रीनींग सुविधेची पाहणी केली. ही तपासणी कशी केली जाते याची माहिती घेतली. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधत त्यांचे कौतुकही केले. यावेळी इमिग्रेशन अधिकारी तपा भट्टाचार्य विमानतळ आरोग्य अधिकारी डॉ ए. आर. पसी आदी उपस्थित होते.

तुषार खरात

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

2 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

3 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

5 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

8 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

8 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

11 hours ago