आरोग्य

सावधान! हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळे हार्टअटॅकचा धोका! जागतिक आरोग्य संघटनेने घातली बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घातली बंदी

टीम लय भारी

नवी दिल्ली : कोरोना (Corona Virus) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अनेक देशांनी कोरोनाबाधित रूग्णांसाठी (COVID-19) हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (hydroxychloroquine) गोळ्यांचा वापर सुरु केला आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या (hydroxychloroquine) वापरावर बंदी घातली आहे. डब्ल्यूएचओने सुरक्षेच्या कारणास्तव कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) उपचारांसाठी वापरण्यात येणा-या, मलेरिया ड्रग हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची चाचणी थांबविली आहे. वृत्तसंस्था एएफपीने ही बातमी दिली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले की, खबरदारी म्हणून कोरोना विषाणूच्या (Corona Virus) उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची क्लिनिकल (hydroxychloroquine) चाचणी तात्पुरती बंद केली आहे.

या निर्णयाची घोषणा डब्ल्यूएचओचे महासंचालक Dr. Tedros Adhanom Ghebreyesus यांनी केली. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) हे एक एंटी-मलेरिया औषध आहे, ज्याची कोविड-19 (COVID-19) संक्रमण होण्यापासून वाचण्यासाठी प्रोफेलेक्टिक उपचार म्हणून चाचणी घेण्यात आली आहे. एका अभ्यासानुसार, अँटीबायोटिक अझिथ्रोमाइसिनबरोबर किंवा त्याशिवाय एन्टीमलेरियल ड्रग हायड्रोक्सीक्लोरोक्विनचा, कोविड-19 च्या (COVID-19) उपचारात रूग्णांना कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून आले होते.

याबाबत बोलताना, Tedros म्हणाले, ‘एक्झिक्युटिव्ह गटाने सॉलिडॅरिटी चाचणीमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वाइनला (hydroxychloroquine) तात्पुरता विराम दिला आहे. डेटा सुरक्षा मॉनिटरींग बोर्डाद्वारे याच्या सुरक्षा डेटाचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र चाचणीसंबंधी इतर गोष्टी चालू राहणार आहेत.’ नुकतेच द लान्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात, कोविड-19 च्या (COVID-19) जवळपास 15 हजार रूग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले गेले आहे, ज्यांना क्लोरोक्वाइन किंवा त्याचे अ‍ॅनालॉग हायड्रोक्सीक्लोरोक्विन दिले आहे. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयाच्या समस्या वाढल्या तर काही ठिकाणी मृत्युदरही वाढलेला दिसून आला.

यापूर्वी डब्ल्यूएचओचे कार्यकारी संचालक डॉ. मायकेल रायन म्हणाले होते की, ‘प्रत्येक सार्वभौम राष्ट्र नागरिकांना कोणत्याही औषधाच्या वापराबद्दल सल्ला देऊ शकेल. यात हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि क्लोरोक्विन आधीपासून परवानाधारक उत्पादने आहेत. परंतु अद्यापपर्यंत हे औषध कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) उपचारामध्ये प्रभावी असल्याचे दिसून आले नाही.’ या औषधाच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल बर्‍याच अधिकार्‍यांकडून इशारे देण्यात आले आहेत. बर्‍याच देशांनी रुग्णालयात क्लिनिकच्या देखरेखीखाली हे औषध क्लिनिकल चाचण्यापुरते मर्यादित ठेवले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

12 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

14 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

14 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

15 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

15 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

16 hours ago