आरोग्य

उन्हाळ्यात सनस्क्रीन लावताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

वाढता उन्हाळा म्हणजे त्वचेच्या रोगाला (skin care) निमंत्रण. उन्हाळ्यात त्वचेची काळजी (skin care)घेणं खुप महत्त्वाचं असतं. त्वचेचं संरक्षण करण्यासाठी अनेक सौंदर्य उत्पादने आपण खरेदी करत असतो. उन्हाळ्याच्या हंगामात उन्हापासून बचाव करण्यासाठी बहुतांश लोक सनस्क्रीनचा वापर करतात. पण सनस्कीन योग्यरितीने काम करण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने लावणे गरजेचे असते. अनेकदा सनस्क्रीन लावूनसुद्धा त्वचा बर्न होते. काळी पडते. त्यामुळे सनस्क्रीन तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवू शकत नाही. सनस्क्रीन लावताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. सनस्क्रीनचा वापर करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. तर जाणून घेऊया सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत. (skin care tips how to Apply Sunscreen For Skin Protection In Summer)

बहुतांश महिला वर्ग सनस्क्रीन लावतात आणि लगेच घराबाहेर पडतात. पण ही सवय नुकसानकारक आहे. सनस्क्रीन शोषून घेण्यासाठी त्वचेला 10 ते 15 मिनिटे लागतात. जर बाहेर जाण्यापूर्वी काही वेळापूर्वी सनस्क्रीन लावले तर त्याचा परिणाम नक्की तुमच्या त्वचेवर चांगला होईल. तुमच्या त्वचेचं संरक्षण होईल.

काहींजण दिवसातून एकदाच सनस्क्रीन लावतात. सनस्क्रीन दिवसातून एकदा जरी लावलं तरी चालतं, असा बहुतांश महिलावर्गाचा समज असतो. पण हा समज चुकीचा आहे. सुर्याच्या तीव्र प्रकाशामुळं सनस्क्रीनचा आसर कमी होऊ लागतो. त्यामुळे दिवसातून 2-3 वेळा लावणं गरजेचं असतं.

काळी मान उजळण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा

जर तुम्ही जास्त वेळ घराबाहेर असाल तर दर २-३ तासांनी सनस्क्रीन लावा. त्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये गेलात किंवा कुठे बाहेर गेलात तरी सनस्कीनचा वापर करा.यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या मते घरातही सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे. अनेकदा आपला समज असतो की, घरात कशाला हवय सनस्क्रीन वगैरे इथं कुठं ऊन लागतं. पण हादेखील समज चुकीचा आहे. उन्हाळ्यात गरम हवा कुठेही वाहू शकते. त्यामुळे त्वचेचे नुकसान होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे घरी असतानाही एकदा तरी सनस्क्रीन लावायला विसरू नका.

बडीशेपचे पाणी प्यायल्याने आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

सनस्क्रीनमध्येसुद्धा त्वचेच्या प्रकारानुसार वेगवेगळे प्रकार मिळतात. म्हणजे तुमची त्वचा जर तेलकट असेल, तर ‘लाईटवेट’ आणि ‘ऑईल फ्री’ लिहिलेलं सनस्क्रीन वापरा. त्वचा कोरडी असेल, तर ज्या सनस्क्रीनमध्ये ग्लिसरिन वा ‘हायाल्युरॉनिक ॲसिड’ आहे,अ्सं सनस्क्रीन उपयुक्त ठरेल.

खूप संवेदनशील असलेल्या त्वचेसाठी ‘झिंक ऑक्साईड’ वा ‘टायटॅनियम डायॉक्साईड’ असलेलं गंधरहित सनस्क्रीन वापरायला सांगितलं जातं. बऱ्याचदा ‘स्किन टाईपचा’ सनस्क्रीनच्या बाटलीवर उल्लेख केलेला असतोच, तो तपासून घेतल्यास योग्य सनस्क्रीन निवडणं सोपं होईल.

धनश्री ओतारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

6 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

7 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

8 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

10 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

11 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

12 hours ago