आरोग्य

लंडनमध्ये अडकलेला तरूण सुप्रियाताईंमुळे २४ तासांत भारतात

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या लोकांना खासदार सुप्रियाताई सुळे सातत्याने मदत करीत आहेत ( Supriya Sule helps to people in Lockdown ). गेल्या चार महिन्यांपासून लंडनमध्ये अडकलेल्या एका तरूणाला सुप्रियाताईंच्या मदतीमुळे अवघ्या २४ तासांत भारतात येणे शक्य झाले आहे.

अजिंक्य शिंदे हे काही कामानिमित्त फेब्रुवारीमध्ये लंडनला गेले होते. पण ‘कोरोना’चा प्रादुर्भाव अचानक वाढला. भारतात व ब्रिटनमध्ये ‘लॉकडाऊन’ लागू झाला. विमान सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे शिंदे ब्रिटनमध्येच अडकून पडले.

शिंदे यांना यांना परत यायचे होते. त्यांनी बराच खटाटोप केला. पण काही केल्या त्यांना विमानाचे तिकिट मिळत नव्हते. अशा वेळी शिंदे यांनी त्यांचे मित्र स्वप्नील राजवाडे यांच्याशी संपर्क साधला. राजवाडे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी मनाली भिलारे यांना ही माहिती दिली. भिलारे यांनी ही माहिती खासदार सुप्रियाताईंना दिली.

हे सुद्धा वाचा

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा निरोप आला, अन् IAS शेखर चन्ने यांनी अडचणीत असलेल्या 9 जणांना घरी पोचविले

Supriya Sule : सुप्रिया सुळेंची माणूसकी, लॉकडाऊनमुळे ताटातूट झालेल्या माय लेकराची घालून दिली भेट

Covid19 : सुप्रिया सुळेंना लोक विचारताहेत, राजेश टोपे डॉक्टर आहेत का ?

खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

त्यानंतर सुप्रियाताईंनी लंडनमधील उच्चायुक्त कार्यालय तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना ट्विट केले ( Supriya Sule tweet ). संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून विनंती केली. त्यानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून शिंदे यांना संपर्क साधण्यात आला. एवढेच नव्हे तर, शिंदे यांना तातडीने विमानाचे तिकिट उपलब्ध करून देण्यात आले ( Supriya Sule helped to Ajinkya Shinde, who stuck in London ) . त्यानंतर शिंदे भारतात पोहचले.

या सगळ्या घडामोडी अवघ्या २४ तासांत घडल्या. अवघड वाटणारा हा परतीचा प्रवास सुप्रियाताईंनी चुटकीसरशी सोपा करून दिला. त्यामुळे शिंदे यांनी सुप्रियाताईंसह मनाली भिलारे व स्वप्नील राजवाडे यांचे आभार मानले आहेत. शिंदे यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. ‘ताई आपल्या हक्काची’ हा मला अनुभव आल्याचे शिंदे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

तुषार खरात

Recent Posts

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

37 mins ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

57 mins ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

1 hour ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

3 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

4 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

4 hours ago