आरोग्य

फसवणूक : रामदेव बाबा विरुध्द सरकार गुन्हा दाखल करणार

टीम लय भारी

देहरादून : रामदेव बाबांच्या पतंजलीला कोरोनावरील ‘कोरोनिल’ औषध बनवल्याचा दावा चांगलाच महागत पडत आहे. (Uttarakhand Ayurveda Department Notice To Patanjali) राजस्थान सरकारने  रामदेव बाबा विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. उत्तराखंड आयुर्वेद विभागाने नोटीस जारी करत पतंजलीलाला औषध लॉन्च करण्याची परवानगी कोणी दिली,असा सवाल उपस्थित केला आहे  विशेष म्हणजे पतंजलीला कोरोनाच्या औषधीचा परवानगी दिलीचं नव्हती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पतंजलीकडून उत्तराखंड आयुर्वेद विभाची फसवणूक…

“पतंजलीच्या आवेदनावर आम्ही परवाना जारी केला. या आवेदनात कुठेही कोरोना विषाणूचा उल्लेख नव्हता. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कफ आणि तापाचं औषध बनवण्यासाठी परवाना घेत असल्याचं म्हटलं आहे”, अशी माहिती उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी पतंजलीला नोटीस पाठवण्यात आल्याचंही अधिकाऱ्याने सांगितलं.

रामदेव बाबांचा दावा खोटा; राजस्थान सरकार…

राजस्थान सरकारने रामदेव बाबाच्या कोरोनावरील कोरोनिल औषधाचा दावा खोटा असल्याचं सांगितलं होतं. ‘अशा परिस्थितीत बाबा रामदेव अशा प्रकारे कोरोनावरील औषध विकण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चुकीचं आहे’, असं राजस्थान सरकारचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनी सांगितलं (Uttarakhand Ayurveda Department Notice To Patanjali).

केंद्रीय आयुष मंत्रालयानेही पतंजलीला नोटीस…

“आयुष मंत्रालयाच्या नोटिफिकेशननुसार, बाबा रामदेव यांनी आयसीएमआर आणि राजस्थान सरकारकडून कोरोनाच्या आयुर्वेद औषधाच्या चाचणीसाठी परवानगी घ्यायला हवी होती. मात्र, विना परवानगी आणि कोणत्याही निकषाशिवाय चाचणीचा दावा केला गेला”, हे चुकीचं आहे, असं रघु शर्मा यांनी सांगितलं.  तसेच, केंद्रीय आयुष मंत्रालयानेही पतंजलीला नोटीस बजावली आहे. बाबा रामदेवने मंत्रालयाच्या परवानगीशिवाय प्रसारमाध्यमांमध्ये या औषधचा दावा करायला नको होता. याप्रकरणी आयुष मंत्रालयाने बाबा रामदेवला जबाब विचारला आहे, असं केंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाईक यांनी ‘एका वृत्तवाहिनीला’ सांगितलं.

 

 

राजीक खान

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

7 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

7 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

8 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

8 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

9 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

11 hours ago