आरोग्य

WHO : मास्क कुणी आणि केव्हा वापरावा!

टीम लय भारी

मुंबई : कोरोनामुळे सगळं जग हैराण झालं आहे. विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जगभरातील (WHO updated guidelines on Mask) लोक चेहऱ्यावर मास्क लावत आहेत. प्रत्येक देशाचे सरकार आपापल्या देशातील नागरिकांना सुरुवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मास्क वापरायचं आवाहन करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने मास्कबाबत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत (WHO updated guidelines on Mask) .

जागतिक आरोग्य संघटनेने नव्या गाईडलाईन्समध्ये कुणी-कधी मास्क वापरावं, मास्क कशाचे तयार केले असावेत, याबाबत माहिती जारी केली आहे. “ज्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागात मास्क घालणं बंधनकारक आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणीदेखील आवर्जून मास्क वापरावं. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होईल”, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.

नेमक्या गाईडलाईन्स काय आहेत?

1) कोरोनाचं संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेल्या परिसरात सरकारने सर्व नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करावं.

2) सार्वजनिक ठिकाणी, दुकानं आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं अनिवार्य करावं.

3) कम्युनिटी ट्रान्समिशन ज्या भागात झालं आहे त्या भागात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांनी मेडिकल मास्क घालावं.

4) मेडिकल मास्क तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी काही महत्त्वपूर्ण तीन घटकांचा वापर साध्या मास्कच्या निर्मितीतही करावा.

 मास्क वापरल्याने सुरक्षित राहता येणार नाही’

“मास्क वापरल्याने लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत, असं म्हणता येणार नाही. मात्र, मास्क वापरल्याने संसर्ग होण्याचा धोका कमी असतो”, असं जागतिक आरोग्य संघटेचे प्रमुख टेड्रोस अदनोम म्हणाले आहेत.

हाच एक कोरोना महामारीविरोधात लढण्याचा मार्ग

“कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाची माहिती काढणे आणि त्याला आयसोलेट करणं जरुरीचं आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णाच्या क्लोज कॉन्टॅक्टमधील लोकांना क्वारंटाईन करायला हवं. हाच एक कोरोना महामारीविरोधात लढण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे”, असंदेखील टेड्रोस अदनोम म्हणाले आहेत.

राजीक खान

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago