corona update : देशात १ लाख ९४ हजार रूग्ण कोरोनामुक्त!

टीम लय भारी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग देशात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाचे सर्वाधिक तब्बल १२ हजार ८८१ रुग्ण वाढले असून, ३३४ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. याचबरोबर देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ९४६ वर पोहचली आहे.

देशातील एकूण ३ लाख ६६ हजार ९४६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी सध्या १ लाख ६० हजार ३८४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२५ जणांना उपचारानंतर रुग्णलायतू सुट्टी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात १२ हजार २३७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यातआली आहे. याचबरोबर काल (१७ जून) पर्यंत तब्बल ६२ लाख ४९ हजार ६६८ नमूने तपासणी करण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार ४१२ नमूने मागील चोवीस तासांत तपासले गेले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून ही माहिती देण्यात आली आहे.

करोनाच्या एका नमुना चाचणीसाठी चार हजारांहून अधिक खर्च येतो. मात्र, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांनी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी चर्चा केली असून कमी किमतीत नमुना चाचण्या करण्यावर सहमती झाली आहे. महाराष्ट्रात प्रति चाचणी सुमारे अडीच हजार रुपये खर्च येतो. दिल्लीतही स्वस्तात नमुना चाचण्या करण्याची मागणी सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी कमी किमतीत नमुना चाचणी करण्यासंदर्भात करार करण्याची सूचना केली आहे.

राजीक खान

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

5 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

6 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

7 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

7 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

7 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

10 hours ago