टीम लय भारी
मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यानंतर आता एनआयएच्या हाती सचिन वाझे यांची २०० पानी डायरी लागली आहे. आता त्या डायरीतून अनेक आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सचिन वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. तसेच त्यांनी कोड लँग्वेजमधील हिशोब देखील लिहून ठेवले आहेत.
हफ्त्याची गुपिते उघडकीस येणार
सचिन वाझेंच्या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.
कोड भाषेत नोंद
लाखाच्या नोंदीसाठी L, तर हजाराच्या नोंदीसाठी K हे अक्षर वापरले आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशाचे वाटप नियमित होत होते. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. व्यक्तीऐवजी विभाग लिहिण्यात आला आहे.
एनआयए आणि ईडीचा समांतर तपास
एनआयए आणि ईडी समांतर तपास करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच आलिशान गाड्या, साडेपाच लाखांची रोकड, पैसे मोजण्याची मशीन आणि संशयित डायरी ईडीच्या रडारवर आहे. गुन्ह्यात आर्थिक गैरव्यवहाराचा तपास ईडी करण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमधूनही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. पोलिस दलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस येणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
ईडीचा ससेमिरा मागे लागण्याची चिन्हे
राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर (एनआयए) आता महाविकास आघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटसकडून १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता. ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडू शकते.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…