महाराष्ट्र

मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी

टीम लय भारी
अमरावती : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला आज पूरग्रस्तांबाबत महत्त्वाचे आदेश दिले. मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी (Advocate yashomati thakur to help people)

 

महाराष्ट्रात पूर आपत्ती आलेल्या भागांत पंचनामे व सर्वेक्षणा ची  प्रक्रिया पूर्ण करावी. शेतकऱ्यांना झालेल्या शेतनुकसानीची भरपाई मिळावी. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न संवेदनशीलता दाखवत काळजीपूर्वक हाताळावे. त्यांची चौकशी करावी. एकही नुकसान झालेला व्यक्ती भरपाई शिवाय राहू नये. (Advocate yashomati thakur ordered officials to pay attention to  people’s problems and pay visit to them)

मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू, नितेश राणेंचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रौप्यपदक विजेता मीराबाई चानू यांचे केले अभिनंदन

श्रीमती यशोमती ठाकूर यांनी गेल्या दोन दिवसांपासून र, पुसदा, शिराळा, रामा, टाकखेडा, खरताळेगाव, साऊळ, देवरी, संभु, देवरा, ब्राह्मणवाडा इत्यादी गावांची पाहणी तात्काळ केली. नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर याबाबतची कारवाई व उपाययोजना व्यवस्थित पार पाडण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.

या बैठकीत आमदार बळवंत वानखेडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस आयुक्त आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक शाम घुगे,  सहाय्यक जिल्हाधिकारी, मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, यांच्यासोबतच विविध अधिकारी, उप विभागीय, अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.

पुरात सर्वस्व गमावलेले शेतकरी अक्षरशः उघड्यावर आलेत. मदत पोहोचण्यात वेळ होऊ नये. शेती नुकसानभरपाई चे पंचनामे लौकरात लौकर पूर्ण करावे, काही ठिकाणी पुन्हा नव्याने पेरणी करावी लागणार आहे. त्या शेतांच्या व शेतकऱ्यांच्या नोंदी घ्याव्यात. तालुका कार्यालयाने याबाबतचा पाठपुरावा सतत करायला हवा. मेळघाटातील  कामकाजात सुद्धा लक्ष घालावे. अत्यावश्यक सुविधा काही पुरवण्याची गरज असेल तर त्याच कुचराई करू नये. असे आदेश या बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

यशोमती ठाकूर

पुसदा या गावातील नाल्याजवळचा पूल पूर काळात वरून पाणी वाहिल्याने ठप्प होता. त्या पुलामुळे वाहतूक कोंडी झाली होती. नाले दुथडीभरून वाहू लागण्याने पूरपरिस्थिती उद्भवली. बांधकाम अभियंता अरुंधती शर्मा यांस पुलाची उंची वाढवण्यासाठी काम देताना ऍड यशोमती ठाकूर बैठक्तीत म्हणाल्या. (Pusada bridge is next target to work for)

प्राथमिक अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 500 गावे बाधित असून, त्यातील 23 हजार 555 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे समजते. शेतजमिन वाहून झालेले नुकसानीचे क्षेत्र 881 हेक्टर  इतके आहे. 142 गावांत पंचनामे पूर्ण झाले आहेत व 258 गावांत अजून कामे सुरू आहेत.
अमरावती तालुक्यात 14 गावे व 500 हेक्टर शेती, भातकुली तालुक्यात 137 गावे व 6 हजार 22 हेक्टर शेती  नुकसान ग्रस्त आहे. भातकुली तालुक्यात शेतजमीन खरडून नुकसानीचे क्षेत्र 669 हेक्टर व चांदूर रेल्वे तालुक्यात 27 गावे बाधित व 119.92 हेक्टर शेतजमीनीस नुकसान झाले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेतजमीन नुकसानीचे क्षेत्र 15.79 हेक्टर इतके आहे व नुकसान ग्रस्त गावांची संख्या 5 इतकी आहे. मोर्शी तालुक्यात 2 गावे   139.6 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

दर्यापूर तालुक्यात 154 गावे व 12 हजार 844 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात 45 गावे व 393 हेक्टर शेती वाहून गेली आहे. चिखलदरा तालुक्यात 73 गावे व 1 हजार 108 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. चांदूर बाजार तालुक्यात 43 गावे व 2 हजार 549 हेक्टर शेती पुरामुळे बिकट परिस्थितीत आहे.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता लष्करालाही केले पाचारण

Nearly 1,000 Houses Damaged, Hundreds Evacuated In Flood-Hit Goa

जिल्ह्यातील वलगाव, भातकुली, आसरा, खोलापूर, चांदुर, घुईखेड, सातेफळ, पुसला,बेनोडा, दर्यापूर, दारापूर, खल्लार, थिलोरी, येवदा, अंजनगाव, सातेगाव, कोकर्डा, चांदुर, तळेगाव दशासर, सावलीखेडा, धारणी, हरिसाल, धुळघाट, सादराबाडी या मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.

जीवित हानी झालेल्या कुटुंबातील सासस्यांना वेळ न घालवता तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी असे आदेह पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले. यात वीज पडून 4 बळी गेल्याचे समजते. अमरावती तालुक्यात 1, धरणी तालुक्यात 1 व धामणगाव रेल्वे परिसरात 2 मृत्यू वीज पडून झाले आहेत. तसेच भातकुली तालुक्यात पुराणे  वाहून गेलेल्यात 1 मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर दर्यापूर येथे चक्रीवादळाने भिंत पडली तेथील एक मृत्यू नोंदवला गेला आहे.

चिखलामुळे व गाळामुळे मोजणी करण्यास अडथळे  येऊ शकतात तरी त्या परिस्थितीत सुद्धा काम चालू ठेवावे असे आदेश उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, नितीनकुमार हिंगोले, रणजित भोसले, मनोज  लोणारकर, जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी विजय चवळे, तहसीलदार संतोष काकडे, नीता लबडे, योगेश देशमुख यांना दिले गेले.

https://youtu.be/iaVCpXCU-nE

Mruga Vartak

Recent Posts

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

12 mins ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

18 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

19 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

20 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

20 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

21 hours ago