महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर; गृहमंत्रिपदासाठी या भल्या नेत्यांची नावे चर्चेत…

टीम लय भारी

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते. या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. अशावेळी गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचंही नाव समोर येतंय. तसेच हसन मुश्रीफ हे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळतेय.

जयंत पाटील

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपदावर वीज कोसळली होती. त्यावेळी डिसेंबर २००८ मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली. म्हणजेच संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सहन करण्याची ताकद जयंत पाटलांकडे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

अजित पवार

अजित पवार यांचा दांगडा अनुभव, प्रशासनावरील वचक पाहता अजित पवार यांचे ही नाव गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे. पण अजित पवार यांच्याकडे अर्थखात्यासारखी मोठी जबाबदारी आहे. अशावेळी त्यांच्याकडील अर्थखाते काढून गृहखात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे ही बोलले जात आहे.

दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. वळसे पाटील यांना राज्यकारभाराचाही अनुभवही मोठा आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत एक क्लिन इमेज राष्ट्रवादी काँग्रेसला गरजेची आहे. त्यामुळे वळसे-पाटलांकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

3 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

3 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

4 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

6 hours ago