महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय; अजितदादा पवार यांचा पारा चढला

टीम लय भारी

मुंबई:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीमधल्या एका कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन अजितदादांचा पारा चढला. उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावले आहे (Ajit Pawar mercury rose on an occasion at a program in Baramati).

अजितदादा आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य असो, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो किंवा विरोधक, आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त बोलायचे, मग समोरच्याला राग आला तरी याची फिकीर करायची नाही, असा दादांचा स्वभाव आहे. त्यांचा हा स्वभाव आता बारामतीकरांनाच नव्हे तर महाराष्ट्राला माहिती झाला आहे.

जागतिक कुस्ती स्पर्धा, भारताच्या प्रिया मलिकने पटकाले सुवर्ण पदक

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून भारताला मोठ्या विजयाची आशा

नेहमीप्रमाणे अजित पवार शनिवारी पुण्याच्या आणि रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सर्वसामान्य बारामतीकर आपापली कामे घेऊन अजितदादांकडे येत असतात. आज सकाळी बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे अजितदादांचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी एक व्यक्ती आपले काम घेऊन अजितदादांकडे आला. यावेळी आपल्या कामाकचे निवेदन त्याने अजितदादांना दिले

उपमुख्यमंत्री अजित पवार

माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावे, अशी विनंती संबंधित व्यक्तीने अजितदादांकडे केली. निवेदन पाहून अजितदादा भडकले, उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय, अशा शब्दात अजितदादांनी संबंधित व्यक्तीला सुनावले.

एकाच घरातील सहाजणांचा मृत्यू, नातलगांचा हंबरडा ऐकून उपस्थितांचीही मने हेलावली

Maharashtra Deputy CM Ajit Pawar To Grant Relaxations To Fully Vaccinated People

बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल, असा सज्जड दम अजितदादांनी यावेळी दिला. चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही, असे अजितदादा म्हणाले (what the Deputy Chief Minister did not sit down to recover).

Sagar Gaikwad

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago