महाराष्ट्र

लॉकडाउनच्या गोंधळावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

टीम लय भारी

मुंबई :- काल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकसंबंधी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर सर्वत्र गोंधळ झाला आणि त्यावर विरोधकांकडून जोरदार टिका केली. विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्याची घोषणा केली आणि गुरुवारी एकच गोंधळ उडाला. यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असे चित्र निर्माण झाले. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले. दरम्यान या सर्व गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे (Deputy Chief Minister Ajit Pawar has commented on all the confusion).

लॉकडाउनवरून गोंधळ

“अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. ज्या दिवशी कोरोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर मग अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवार यांनी एक शब्द राहून गेला होता त्यामुळे गैरसमज झाला होता असे स्पष्ट केले आहे. शेवटी सरकार कोणाचे ही असले तरी राज्याचे मुख्यमंत्री सांगतील तो अंतिम निर्णय असतो,” असे अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्ट केले आहे.

छत्रपती घराण्याचं काम हे लोकांना न्याय देण्याचं आहे, लोकांना पेटवण्याचं नाही : खासदार संभाजी छत्रपती

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने संभाजीराजेंचं शिवभक्तांना आवाहन

Petrol price crosses Rs 100 in Andhra Pradesh, Telangana and Leh

विजय वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण

राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाउन (Lockdown) काढण्याचा प्रस्ताव असून त्यास आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो असे स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिले होते.

त्यानंतर पुन्हा शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल.” फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “विरोधक म्हणून त्यांची भूमिका योग्य असून त्यांना ती मांडावीच लागते. पण यामध्ये श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. सरकार म्हणून जे काही करावे लागते ते आम्ही करत असतो.”

फडणवीसांची टीका

“ज्या मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे त्यांच्याकडून कोणते ही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असे सांगतो. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावे. त्यामुळे कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. याआधीही अनेकदा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधने आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचे म्हणणे आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे,” अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“गोंधळ इतका निर्माण झाला आहे की, लॉकडाउन (Lockdown) आहे की नाही यासंदर्भात अनेकांचे फोन आले. आमच्याकडेही त्याचे उत्तर नव्हते. लॉकडाउनमुळे (Lockdown) सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे काल घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटले झाले सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असे वाटले. अनेक दुकानदारांचा ७ ते २ या वेळेला विरोध असून ९ ते ४ करावी अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. सरकारने या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे,” असे ही यावेळी त्यांनी सांगितले.

नेमका काय गोंधळ झाला

गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोरोनास्थिती नियंत्रणात आली असून नव्या बाधितांचा आकडा १५ हजारांच्या घरात तर उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांपर्यंत खाली आली. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तीनच दिवसांपूर्वी काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत पुन्हा एकदा राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. त्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच टप्प्यांत विभागणी करावी आणि त्यानुसार निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने ठेवला होता. चर्चेअंती या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता देताना या निकषांच्या आधारे निर्बंध कठोर किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच या निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार करावा आणि पुन्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आणावा. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणीची घोषणा करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

Rasika Jadhav

Recent Posts

जर केसांची लांबी वाढत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ एक गोष्ट

केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…

2 hours ago

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

3 hours ago

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

20 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

23 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

1 day ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago