महाराष्ट्र

अण्णा हजारेंचा घणाघात : सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची परवड

टीम लय भारी

शिरूर : शेतकरी वर्गाला निसर्गाबरोबरच सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसत असतो. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम कवी व लेखक यांनी करावे असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले ( Anna Hazare scathing to Government ).

कवी व साहित्यिक समाजातील वंचित – शोषित घटकांचे प्रश्न मांडून त्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम करीत असतात असे अण्णा म्हणाले.

शिरूर येथील (आमदाबाद) कवी दत्तात्रय जगताप यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा ‘लांझ्या’ हा काव्यसंग्रह लिहिला आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अण्णा हजारे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी अण्णा बोलत होते. कवी दत्तात्रय जगताप यांच्या कविता ऐकण्याचा मोह अण्णांना यावेळी आवरला नाही.

याप्रसंगी कवी भरत दौंडकर, नारायण सुर्वे कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, मसाप भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक उद्धव कानडे, उद्योजक गुलाबराव धुमाळ, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, कवी सुरेश कंक, दिगंबर ढोकले, अनिल माशेरे, संभाजी साबळे, बंडु थोरात हे उपस्थित होते.

सर्वांचे स्वागत कवी भरत दौंडकर यांनी केले, तर आभार उद्योजक गुलाबराव धुमाळ यांनी मानले.

इंग्रजी अनुवाद : The farmers is affected by the wrong policy of the government along with nature. As a result, farmers are becoming indebted. Senior social activist Anna Hazare appealed to the poets and writers to give the justice to farmers’ issues.

Dattatraya Jagtap, a poet from Shirur, has written a collection of poems titled ‘Lanjya’ which deals with the plight of farmers. This collection of poems was published by Anna Hazare.

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago