महाराष्ट्र

खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची ऑडिओ क्लीप व्हायरल

टीम लय भारी

जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे हे महिनाभरात पक्ष सोडणार असून दुस-या पक्षात काय पद मिळते, केवळ याची प्रतिक्षा आहे असा संवाद असणारी ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, वरणगाव येथील ज्या तरुणासोबत संवाद झाला आहे तो तरुण आता ‘नॉट रिचेबल’ आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील काही जणांना षडयंत्राचा आरोप केला होता. तेव्हापासून खडसे हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली. त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या अशी मागणी करीत आहे.

अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भंगाळे आडनावाच्या एका कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. या चर्चेची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ऑडिओ क्लीपमधील संवाद : व्हायरल झालेल्या या क्लीपच्या संवादानुसार सदर कार्यकर्त्याने खडसे यांच्याशी संवाद साधला आहे.

रविंद्र भंगाळे : भाऊ आता राष्ट्रीय कार्यकारणीतही डावलण्यात आल्याने पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या.

एकनाथ खडसे : हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, असे सांगत महिनाभरात निर्णय घेऊ.

खडसेंचे स्पष्टीकरण

तो कॉल चुकीचा आहे. अशा बाबी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दिवसभर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अनेक कॉल येतात, भाऊ भूमिका घ्या, असा आग्रह धरतात, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

7 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

7 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

9 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

9 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

9 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

11 hours ago