महाराष्ट्र

Balasaheb Thorat : रेशनिंगवरील धान्यवाटपाबाबत तक्रारी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

टीम लय भारी

मुंबई : स्थलांतरीत रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी काही ठिकाणाहून प्राप्त होत आहेत. तसेच नियमित कार्ड धारकांनाही रेशनिंग दुकानदार जादा दराने धान्य विक्री करीत आहेत. अडचणीच्या काळात या स्थलांतरीत कुटुंबाना रेशन उपलब्ध करावे. जादा दराने विक्री होणार नाही याकडेही लक्ष द्यावे असे पत्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था (प्राधान्य कुटुंब व केशरी कार्डधारक) यांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणात व शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे स्थलांतरित ठिकाणी (रेशनकार्ड पोर्टेबिलिटी) धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत.

येथे क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात जी किराणा दुकाने अथवा अत्यावश्यक सेवा केंद्रे उघडी ठेवली जात आहेत. तेथेही सर्वसामान्यांना वाढीव दराने माल विकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. या संदर्भात आवश्यक कार्यवाही करावी. महाराष्ट्रातील लॉकडाउन आता 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास स्वतंत्र हेल्पलाईन निर्माण करावी, अशा सूचना मंत्री थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी दिल्या आहेत.

बाळाासाहेब थोरात यांनी सर्व विबागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे

महसूल मंत्र्यांकडून अधिकारी- कर्मचाऱ्यांचे कौतुक

24 मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल व अन्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी अतिशय प्रभावीपणे, प्रामाणिकपणे रात्रंदिवस काम करीत आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. अतिशय बिकट परिस्थिती आणि उपलब्ध संसाधनाच्या साहाय्याने आपण सर्वजण जे काम करीत आहात, ते निश्चितच अभिनंदनीय असल्याचे महसूल मंत्री थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Varsha Gaikwad : दहावीची भूगोलाची परीक्षा रद्द, नववी व अकरावीचेही सगळे पेपर रद्द

Coronavirus : ‘नरेंद्र मोदींनी सामान्यांकडे दागिने मागण्यापेक्षा श्रीमंतांवर कर लावावा’

अमेरिका रिटर्न व्यक्तीने कॉरन्टाईनचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

16 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

16 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

17 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

17 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

18 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

19 hours ago