महाराष्ट्र

सहकाराचे एक आदर्श मॉडेल राज्याला देणारे भाऊसाहेब थोरात

टीम लय भारी

संगमनेर : शेतकऱ्यांचं राज्य येण्यासाठी स्वातंत्र्यचळवळीत योगदान देऊन सहकाराचे एक आदर्श मॉडेल राज्याला देणारे भाऊसाहेब थोरात हे दुरदृष्टीचे सहकार चळवळीतील अर्थतज्ञज्ज्ञ आणि आदर्श संस्थांचे व्यवस्थापक मानले जातात. शिक्षण व सहकार क्षेत्रात अत्यंत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून कार्य करून समाजाला उन्नत अवस्थेत नेण्यासाठी सच्ची माणसं जोडण्याचे काम त्यांनी आपल्या जीवनात केले(Bhausaheb Thorat, gave an ideal model of cooperation).

सह्याद्री बहुजन शिक्षण संस्थेच्या भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाच्या वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी समाजसेवक प्रा. बाबा खरात यांनी सामाजिक बांधिलकीतून दादांनी संस्थांचा आदर्शवत व गुणवत्तापूर्ण विकास करून जीवनात संघर्षमय जगण्याची नवी उर्मी देण्याचे कार्य देखील केले आहे. दादांसारखी माणसं ही विचारांनी महान व कार्याने देखील महान असून हा प्रेरणा दिन आपणा सर्वांचा ऊर्जास्रोत असून जीवनात नवी प्रेरणा देण्याचे काम होईल(Bhausaheb Thorat was great in thought and also great in deeds).

हे सुद्धा वाचा

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

‘स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक’

MVA government like a three-wheeler? They are extremely useful for the common man, quips Balasaheb Thorat

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद ,थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मच्छिंद्र दिघे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य शिवाजीराव नवले यांनी करून दिला. संस्थेचे सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर यांनी भाऊसाहेब थोरात यांच्या सहवासातील अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केले.

यावेळी प्रमुख अतिथींचा प्रा. बाबा खरात, शाहिर शिवाजीराव कांबळे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .या प्रसंगी सह्याद्री विद्यालयाचे उपक्रमशील गुणवंत कलाशिक्षक मिनिनाथ जोर्वेकर यांना ललित कला केंद्र चोपडा या संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नवनाथ गुंड सर तर आभारप्रदर्शन श्री एस एम खेमनर सर यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य डोखे जी एम, ज्युनियर काॅलेजचे इनचार्ज घोरपडे एस. एस. , विद्यालयाचे उमुख्याध्यापक रहाणे आर. के., इनचार्ज विरेश नवले, शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

Team Lay Bhari

Recent Posts

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

8 mins ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

22 mins ago

मिल्ट्री कॅम्प च्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

1 hour ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

2 hours ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

2 hours ago

सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल…

3 hours ago