संजय राऊतांनी माफी मागावी : भाजपची मागणी

टीम लय भारी

मुंबई : डॉक्टरांपेक्षा कंपाउंडरला जास्त कळते, असे विधान करून कोरोना योद्ध्यांचा अपमान करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे (BJP demands, Sanjy Raut should apologies ).

डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळते, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले ( Sanjay Raut’s controversial statement on Doctors ). या विधानावरून भाजपा आक्रमक झाली आहे. संजय राऊत यांनी असे विधान करून कोरोना योद्ध्यांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.

हे सुद्धा वाचा

पार्थ पवारांच्या नावाने लोकांना मदतीचा हात

धनगर समाजाच्या ‘या’ मागणीसाठी सुप्रिया सुळे पुढाकार घेणार

मंत्रीमंडळाची बैठक रायगडावर घ्यावी : छत्रपती संभाजीराजे

VIDEO : देवेंद्र फडणविसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; बदल्यांमध्ये ‘अर्थ’पूर्ण व भयानक प्रकार

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेला काय कळते ? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झाले? खरेतर डॉक्टरांपेक्षा कंपाउंडरला जास्त कळते. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कंपाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळते, असे राऊत म्हणाले होते.

तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे, असे खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केले (Sanjay Raut said, coronavirus spread due to World health organization ).

दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानावरून भाजपा आक्रमक झाली आहे  ( BJP aggressive against Sanjay Raut ). कोरोनाच्या संकटात डॉक्टर हे देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी असे विधान करणे म्हणजे डॉक्टरांचा फार मोठा अपमान आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व डॉक्टरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

 

 

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

15 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

16 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

16 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

19 hours ago