टीम लय भारी
मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक भावनिक ट्वीट केले आहे. या ट्वीटनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोत्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, असे आव्हाडांनी म्हटले होते. हाच धागा पडकत प्रवीण दरेकर यांनी आव्हाडांना आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे. ‘आज जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात. पण, माझे तर म्हणणे आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणारे मुख्यमंत्री आपले घर कोरोनापासून सुरक्षित ठेवून शकत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकार संभ्रमावस्थेत आहे, असे ही ते म्हणाले आहेत.
‘आव्हाड म्हणतात २० लाख कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले? आव्हाडांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले हे एकदा तपासून पाहावे. केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला अधिक मदत केली आहे. केंद्र सरकारने अन्नधान्यांपासून ते कोरोनाच्या लसीपर्यंत सर्व सुविधा महाराष्ट्राला दिल्या आहेत. त्याची आव्हाडांना कल्पना नसावी. पण आम्ही आव्हाडांना त्याची आकडेवारी पाठवून देऊ,’ असे दरेकर यांनी म्हटले आहे.
‘कोरोनाची सुरवात झाली तेव्हापासून भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता रस्त्यावर उतरला होता. जेव्हा सरकार क्वारंटाइन झाले होते. कोरोनाचा पिक टाइम होता तेव्हा सरकार मातोश्रीत बसले होते. त्यावेळेला विरोधी पक्ष नेते, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरुन लढाईत काम करत होते. त्यामुळे सरकार म्हणून आपण लोकांमध्ये जावे जेणेकरुन या आरोग्य व्यवस्थेला ठिकठाक करता येईल,’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…