महाराष्ट्र

Shock : ठाकरे सरकारला भाजपकडून वीजबिलाचा ‘शॉक’, तर २६ नोव्हेंबरला मनसेचे आंदोलन

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी (Shock) सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. (The Bharatiya Janata Party will organize a statewide electricity bill Holi agitation.)

या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. २६ नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. (On November 26, MNS will hold a morcha at all the Collectorate offices in the state)

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण ठाकरे सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच स्वत: वीजबिलांबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजप वीजबिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे.

लॉकडाऊन काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वत:हून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीजबिले आली. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी वीजबिलांची होळी करून सरकारचे लक्ष वेधतील.

मनसेचे २६ नोव्हेंबरला आंदोलन

वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. २६ नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही मनसेकडून २६ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी होणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली आहे. ज्यांना वीज बिलाचा शॉक बसला आहे, अशा सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या घोषणेलाच टार्गेट करत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्ये या होर्डिंगजवर लिहिण्यात आली आहेत.

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’

वीज दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धारच मनसेने केला असून दरवाढी विरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी केली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या घोषणेलाच टार्गेट करत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्ये या होर्डिंगजवर लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे हे होर्डिंग्ज सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

अभिषेक सावंत

Recent Posts

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

51 mins ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 hour ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 hour ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

3 hours ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

4 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

5 hours ago