नाशिक लोकसभे निवडणूक लढवण्यावर भुजबळ स्पष्टच बोलले

नाशिक लोकसभा मतदार संघातून भुजबळ (Chhagan Bhujbal) महायुतीचे उमेदवार असणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ समर्थकांकडून एक टीझर व्हायरल करण्यात आला आहे. दरम्यान, भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणूक लढवण्यावर आपलं मत स्पष्ट केलं आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीतील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या जागेवरुन शिवसेना आणि भाजप आमने सामने असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (chhagan bhujbal clarification on Nashik Lok Sabha Election)

मागील काही दिवसांपासून भुजबळ मुंबईत होते. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. शिवाय नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असल्याचे छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात नाशिक मतदासंघाबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. आता यासर्वांवर स्वतः भुजबळ यांनी भाष्य केलं.

काय म्हणाले भुजबळ?

नाशिकच्या मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळं आपण थोड संयम राखुया. नाशिकसाठी कोणही उमेदवार उभारला तर तीनही पक्ष त्याला पाठिंबा दिला. आमची एकच मागणी म्हणजे शिंदे गटाएवढी आम्हाला जागा द्या अशी आहे. मला नाशिकमधून उमेदवारी द्या ही माझी भूमिका नाही. असं भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आपल्याला जागा मिळावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं असत. महायुतीत कोणतही भांडण नाही. मतप्रदर्शन करणं म्हणजे वाद नाही. महायुतीत चर्चा होईल मगच नाशिकबद्दल निर्णय होईल. तेव्हा उमेदवार ठरेल. त्याला पाठिंबा दिला जाईल. मी कोणत्याही गोष्टीवर आडून बसलेलो नाही. राष्ट्रवादीकडून नाशिकच्या जागेची चाचपणी सुरु आहे. असं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

तसेच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. वैयक्तिक कामासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. सिडीको मध्ये आमचा प्लॉट आहे. ती शाळेची जागा आहे. त्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यासाठीच मी त्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक महत्त्वाची पदं आहे. त्यासाठी मी त्यांना भेटलो. त्यामुळे शिवसैनिकांनी काळजी करण्याची गरज नाही. आमची राजकीय भेट नव्हती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

यासोबत राज ठाकरे महायुतीसोबत येण्याने पेच निर्माण झाला आहे का? अशी विचारणा केली असता भुजबळ म्हणाले, राज महायुतीत येणार का यावर मी बोलणार नाही. पक्षातील वरिष्ठ नेते आणिी राज ठाकरे निर्णय घेतील. पण त्यांच्या येण्याने महायुतीत कोणताही पेच नाही. मनसेमुळं महायुती भक्कम होईल अस भुजबळ यावेळी म्हणाले.

नाशिकची जागा कोणाला

लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तरी अद्याप महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेमुळे वाद सुरु आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी नाशिकच्या जागेवरुन मलाच उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानासमोर शक्तीप्रदर्शनही केलं आहे.

तर राष्ट्रवादीचे अनेक नेतेही नाशिकच्या जागेसाठी ठाम आहेत. अशातच आता भुजबळांच्या समर्थकांकडून व्हायरल केल्या जाणाऱ्या टीझरमुळे नाशिक मतदारसंघात नवा ट्विस्ट आला असून शिवसेना-भाजपसह उमेदवारीच्या शर्यतीत अजित पवार गटदेखील सामील होणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नाशिकची जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

धनश्री ओतारी

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

3 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

3 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

5 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

6 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

6 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

6 hours ago