सर सलामत तो हेल्मेट पचास : छगन भुजबळ

टीम लय भारी

नाशिक: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिक येथील सदभावना पोलीस पेट्रोल पंप, गंगापूर रोड येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेचा शुभारंभ पार पडला. या मोहिमेला हिरवा कंदील दाखवत, ‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ असे सांगत वाहनचालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे (Chhagan Bhujbal has appealed to the drivers to wear helmets).

आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी कोणतेही वाहन चालविताना आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच आज जिल्ह्यात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरिकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन भुजबळांनी केले (Chhagan Bhujbal said We all need to follow traffic rules while driving).

ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारला फटकारले

भाजपचे नेते घरात रेमडेसिव्हीर, ऑक्सीजन तयार करतात का ? छगन भुजबळ यांचा सवाल

या मोहिमेसाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 2 हजार 53 हेल्मेट उपलब्ध करण्यात आले आहेत. भुजबळांच्या हस्ते उपस्थित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. आमदार सरोज अहिरे व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालून पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते आपल्या गाडीत पेट्रोल भरून या मोहिमेला सुरूवात केली आहे (Chhagan Bhujbal was distributed to the Helmets senior officers and staff).

छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेचा शुभारंभ पार पडला.

पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ राबविण्यात येणार

अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारी ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहीम नागरिकांच्या हितासाठी आहे. नागरीकांचा जीव वाचविणे हेच या मोहिमेचे मुख्य उद्दीष्ट आहे. सदर मोहीम यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे, असे पोलीस आयुक्त पाण्डेय म्हणाले.

नितीन गडकरींवर ‘दाढीवाल्या’चा दबाव, नाना पटोेलेंचा आरोप

‘There is proof he received kickbacks’: ACB opposes Chhagan Bhujbal’s discharge plea

नागरीकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात हातभार लावला जाईल. हेल्मेट न घातल्याने होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षत घेवून, सर्व पेट्रोल पंपावर सीसीटिव्ही कॅमेरे लावून हेल्मेट न घालणाऱ्या बेशिस्त नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना देखील पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल पंप व शहर पोलिसांच्या संमतीने पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांना पेट्रोल देण्याचे प्राधन्य देण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू, असा विश्वास पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी व्यक्त केला.

इतर मान्यवरांची उपस्थित

यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले- श्रींगी यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व पेट्रोल डिलर संघटनेचे अधिकारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते (Chhagan Bhujbal and other dignitaries were present).

Sagar Gaikwad

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

3 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

4 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

4 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

6 hours ago