महाराष्ट्र

Meals to corona patients : जिल्हाधिकाऱ्यांनी सीओंना झापले; रूग्णांना निकृष्ट जेवण देता, किमान येथे तरी ‘खाऊ’ नका

मोरेश्वर सुरवाडे : टीम लय भारी

जळगाव : सरकारने कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी जेवणाची (Meals to corona patients) तरतूद केली आहे. सकस आणि पोषक आहारासाठी प्रत्येक रुग्णाला 150 रुपये देण्याची सरकारने तरतूद केली आहे. मात्र शिवभोजन केंद्रातील 5 रुपये किमतीचे कॅरीबॅग मधील निकृष्ट जेवण कोरोबाधित रुग्णांना देऊन (bad food were given to corona patients) सगळे पैसे हडपण्याचा अधिका-यांचा डाव दस्तूरखुद्द जिल्हाधिका-यांनीच रंगेहाथ उघडकीस आणला आहे.

रावेर येथील कोविड सेंटरला भेट दिली असता अतिशय संतापजनक आणि धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली. कोविड सेंटरमधील रुग्णांना जे जेवण पुरवले जाते (Meals to corona patients) ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि प्लास्टिक कॅरीबॅग मध्ये (Incomplete meals were given to corona patients) आढळून आल्याने जिल्हाधिका-यांनी रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना सर्वांसमोर (CEO were warned by the Collector) खडे बोल सुनावले.

Lockdown 5.0 : शरद पवारांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरेंकडून ‘लॉकडाऊन’ शिथील होण्याची शक्यता

शासन कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी (Meals to corona patients) सकस आणि पोषक आहारासाठी (A healthy and nutritious diet to corona patients) प्रत्येक रुग्णासाठी 150 रुपये देत असताना शिवभोजन केंद्रातील 5 रुपये किमतीचे कॅरीबॅग मधील निकृष्ट जेवण का आणता? कोरोना रुग्णांचे कमीत कमी खाण्याचे पैसे तरी खाऊ नका, थोडी तरी शिल्लक ठेवा. अशा प्रकारे थेट हल्लाबोल करत अधिका-यांची इभ्रत सर्वांसमोर काढल्याने नगरपालिका अधिकारी व कर्मचा-यांची धांदल उडाल्याचे दिसून आले. तसेच रावेर येथील शिवभोजन केंद्राचे जेवण निकृष्ट दर्जाचे (Meals of Shivbhojan Kendra are of inferior quality) असून त्यावर खुद्द जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनीच एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे (Jalgaon Collector Dr. Avinash Dhakne) हे गुरुवारी भुसावळ, फैजपूर, सावदा आणि त्यानंतर रावेर येथे आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी रावेर येथील कोविड सेंटरला (COVID-19) भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांना दिल्या जाणा-या (Meals to corona patients) उपचार व सोईसुविधांची (Treatment and facilities for corona patients) पाहणी केली.

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रावेर येथील कोविड सेंटरला भेट दिली.

दरम्यान कोविड सेंटरमधील समस्यांबाबत (Meals to corona patients) जिल्हाधिका-यांनी नोडल अधिका-यांना विचारणा केली. डॉ. एन. डी. महाजन यांनी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांची आणखी आवश्यकता असल्याचे तसेच काही वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णांसाठी प्राथमिक आवश्यक असलेल्या बाबी सांगितल्या. त्यावर जिल्हाधिका-यांनी तात्काळ पुरवठा करण्याच्या प्रशासनास सूचना दिल्या.

रावेर कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर जिल्हाधिका-यांनी कापूस खरेदी केंद्र आणि कंटेनमेंट झोन याबद्दल माहिती जाणून घेतली. रावेर तालुक्यातील सर्व परिस्थितीचा आढावा यावेळेस जिल्हाधिका-यांनी घेतला. याप्रसंगी फैजपूर प्रांत उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, रावेर तहसीलदार अभिलाषा देवगुणे, रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, कोविड सेंटर नोडल अधिकारी डॉ. एन. डी. महाजन, रावेर नगरपालिका मुख्याधिकारी रविंद्र लांडे आदींसह सर्व विभागातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

Jitendra Awhad attacks on BJP : जितेंद्र आव्हाडांनी भाजपला झोडपले

Anil Gote scathing on Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे कपटी, नीच, दगलबाज, हृदयशून्य व्यक्ती

मुंबई असुरक्षित राज्यकारभार नागपुरातून चालवा, ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी!

डॉन अरुण गवळीच्या सुट्टीला लॉकडाऊन; कारागृहात शरण होण्याचे आदेश!

अभिषेक सावंत

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

13 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

14 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

16 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

16 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

17 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

17 hours ago