Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटकाळात राबणाऱ्या हातांचा सन्मान

विनोद मोहिते : टीम लय भारी

इस्लामपूर : सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नागरिकांनी एकत्र येत सुरू केलेल्या ‘माणुसकीचं नातं’ उपक्रमाचा आज शनिवारी ५० वा दिवस होता. ‘कोरोना’च्या ( Coronavirus ) पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या दरम्यान भुकेल्या नागरिकांना आणि गरजू कुटुंबांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपणाऱ्या ‘त्या’ राबणार्‍या हातांचा शनिवारी (ता.१६ ) सन्मान करण्यात आला.

सुवर्णमहोत्सवी दिवसाचे औचित्य साधत गेले ५० दिवस अथकपणे फूड पॅकेट्सचे पॅकिंग करणाऱ्या आणि दोन वेळचे जेवण गरजूंना पोहोचवणाऱ्यांचा सन्मान केला गेला.

महिला पोलीस सारिका घाडगे व सुनीता साळुंखे, तसेच वाटपाचे नियोजन करणारे पोलीस हवालदार संपत वारके, यशवंत कोळी, प्रशांत यादव जेवणाचे नियोजन करणारे पिंटू यादव यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत कौटुंबिक सत्कार करण्यात आला.

मार्च महिन्याच्या उत्तरार्धात इस्लामपूर शहरात कोरोना ( Coronavirus ) विषाणू संसर्गाचे २६ रुग्ण आढळले होते. इस्लामपूर शहर चर्चेत आले. त्यांनंतर इस्लामपूरकरांनी एका वेगळ्या शिस्तीचे दर्शन घडविले अन् त्यातून ‘कोरोना’मुक्तीचा ( Coronavirus ) इस्लामपूर पॅटर्न निर्माण झाला.

सुरूवातीला इस्लामपूर शहर पूर्णतः बंद झाले होते. ‘कोरोना’ची ( Coronavirus ) दहशत निर्माण झाली होती. याच दरम्यान आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन, पोलीस अधिकारी व कर्मचारी,  नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

‘कोरोना’ ( Coronavirus ) वाढू नये म्हणून दक्षता घेत असताना सतत ‘कोरोना’बाधितांच्या ( Coronavirus ) संख्येत भर पडत होती.

अशा वातावरणात झोपडपट्टीत राहणारे गोरगरीब लोक,परप्रांतीय लोक,स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अन् हातावरचे पोट असणाऱ्या लोकांच्या पोटापाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला होता. ते पुरते हतबल झाले होते.

अशा लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे मुश्कील झाले होते. त्यांच्यासाठी काही करता येईल का ? असा विचार पुढे आला. अन् पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ‘माणुसकीचं नातं’ हा ग्रुप निर्माण केला. या संकल्पनेला उद्योजक सर्जेराव यादव, डॉ. अशोक शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाठींबा दिला.

इस्लामपूर शहरातील अनेक दिलदार, निस्पृह अन संवेदनशील मनाच्या लोकांनी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली. सकाळ – संध्याकाळी ७७५ फूड पॅकेट्स वितरीत केली जात आहेत. गरीब लोकांना आज अखेर १३२० अन्नधान्याचे महिनाभर पुरेल इतकी किट्स वाटप केली गेली आहेत. या उपक्रमाला १६ मे रोजी पन्नास दिवस दिवस पूर्म झाले. म्हणून या उपक्रमाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला.

गेली ५० दिवस माणुसकीचं नातं हा उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी आर्थिक मदत करणारे असंख्य दाते या उपक्रमाचे शिल्पकार आहेत. पैसे देणारे हात पुढे येतात.

पण प्रत्यक्षात ( Coronavirus ) पहिल्या दिवसापासून फूड पॅकेट्सचे ‘पॅकेजिंग’ करणाऱ्या इस्लामपूर निर्भया पथकाच्या महिला पोलीस,  हे जेवण इस्लामपूर शहरात अन शहरालगतच्या गावातील झोपडपट्टीत अन् घराघरात अथकपणे वितरण करणारे पोलीस हवालदार संपत वारके, यशवंत कोळी, प्रशांत यादव आणि सर्जेराव यादव हॉलचे काम पाहणारे पिंटू यादव हे ऊन – वारा – पाऊस याची तमा न बाळगता कोरोना योद्ध्याप्रमाणे कार्यरत आहेत.

या सगळ्यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. अनौपचारिक कार्यक्रमात माणुसकीचं नातं परिवाराच्या वतीने सर्जेराव यादव, शामराव पाटील, रणजीत मंत्री, डॉ. एन. टी. घट्टे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

Yuva Sena : बोरिवलीत युवासेनेतर्फे अन्नधान्याचे वाटप

Corona : शेतक-यांच्या अंगणात सदाभाऊंचे अनोखे आंदोलन

तुषार खरात

Recent Posts

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

28 seconds ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

20 mins ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

13 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

13 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले…

13 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

15 hours ago