महाराष्ट्र

गोपीचंद पडळकरांचा सन्मान करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकाची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, ‘लय भारी’चा इम्पॅक्ट

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सन्मान देणारे नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ टीमू एडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केली आहे ( NCP corporator suspended by party, who felicitated to Gopichand Padalkar ). एडके यांनी पडळकर यांचा सन्मान केल्याची बातमी सर्वप्रथम ‘लय भारी’नेच प्रसिद्ध केली होती.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड रोष आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते पडळकर यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने करीत आहेत. पडळकर यांना घराबाहेर फिरू देणार नाही, असे इशारेही राष्ट्रवादीकडून देण्यात येत आहेत.

राष्ट्रवादीमध्ये पडळकरांविरोधात आग धुमसत आहे. परंतु राष्ट्रवादीचेच नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ टीमू एडके यांनी पडळकर यांना चक्क सन्मानाची वागणूक दिली. पडळकर यांना स्वतःच्या घरी ते घेऊन गेले. पडळकरांचा त्यांनी सत्कारही केला. ही बातमी सर्वप्रथम ‘लय भारी’नेच प्रसिद्ध केली होती.

एडके यांनी पक्षशिस्तीचा भंग केलाच. परंतु वादग्रस्त वक्तव्य केलेल्या पडळकर यांना सन्मानही दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकाराची गंभीर दखल घेत एडके यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी ही कारवाई केली.

तुषार खरात

Recent Posts

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

9 mins ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

40 mins ago

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

2 hours ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

3 hours ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

16 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

17 hours ago