विनयभंग : पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे निलंबित

लयभारी न्यूज नेटवर्क

मुंबई : पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी निलंबित करण्यात आले. मोरे यांच्या जामीनावर आज पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी होती. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळा. मोरे सध्या फरार असून तक्रारकर्ती तरुणीही बेपत्ता आहे.

पुणे येथे एस.टी.विभागात कार्यरत असलेले पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाची तक्रार होती. तळोजातील एक विकासक व पोलीस उपमहानिरीक्षक मोरे यांचे एकमेकांच्या घरी येणेजाणे होते. मोरे यांनी विकासकाकडून गाळे विकत घेतले होते. पण त्यांचे उर्वरीत रक्कम न दिल्याने विकासकाने पोलिसांकडे तक्रार केली होती. जूनमध्ये त्यांच्या १७ वर्षाच्या मुलींच्या वाढदिवशी पोलीस उपमहानिरीक्षक मोरे घरी आले आणि मुलीच्या गालावर व शरिरावर केक लावून अश्लील वर्तन केले, अशी तक्रार करताच गुन्हा दाखल केला होता.

सहा महिने तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ….

पोलिसांनी पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरोधात अल्पवयीन मुलगी जूनमध्ये तक्रार देण्यास गेली होती. परंतु सहा महिने पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती. अखेर सहा महिण्यानंतर २६ डिसेंबररोजी तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारकर्ती तरुणी बेपत्ता….

मला शोधण्याचा प्रयत्न करु नये. माझ्या आत्यहत्येस डीआयजी जबाबदार असतील, अशी चिठ्ठी या पीडित तरूणीने लिहून ठेवली आहे.

राजीक खान

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

7 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

7 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago