टीम लय भारी
मुंबई :- दादर पूर्वेतील पुरंदरे मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी उद्घाटन करण्यात आले होते. वडाळा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. औपचारिक उद्घाटनानंतर मैदानावर काही चेंडू खेळत फडणवीस यांनी खेळाच्या मैदानावरील आपली फटकेबाजीही दाखवून दिली. क्रिकेटच्या खेळपट्टीवर फटके लगावल्यानंतर त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजीही केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मजाच येते. सध्या मला इतके लूज बॉल मिळत आहेत की, त्यांना सीमारेषेबाहेर फेकावेच लागणार आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात फटकेबाजी सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. लहानपणी बॅटिंग आणि बॉलिंग आवडीने करायचो. फिल्डिंग क्वचितच करायचो, पण जेव्हा करायचो तेव्हा माझी ‘कॅच’ कधीच सुटली नाही, असे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.
क्रिकेट खेळायला नेहमीच आवडते. बॅटिंग करायला आवडत असले तरी गोलंदाजीसुद्धा आवडते, पण मी बॉडीलाईन बॉल टाकत नाही. गोलंदाजी करताना विचारपूर्वक स्टम्पवरच बॉल टाकत असतो. संधी मिळेल तेव्हा वेगवान गोलंदाजी करणार आणि गुगलीही टाकणार, पण मी कधी शॉर्ट पिच बॉल टाकणार नाही, असे सांगत फडणवीस यांनी क्रिकेटच्या भाषेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…