महाराष्ट्र

पाठ्यक्रमातून काढाल, पण सावरकर, डॉ. हेडगेवार लोकांच्या मनातून कसे काढाल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

उत्तर प्रदेश सरकारने पाठ्यपुस्तकातून मुगलांचा इतिहास काढला, केंद्राने विज्ञानाच्या पुस्तकातून डार्विनची हकालपट्टी केली. हा भाजपचा इतिहास बदलण्याचा अजेंडा विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झालेला असताना कर्नाटक सरकारने पाठ्यपुस्तकातून वीर विनायक सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा धडा वगळल्याची कृती केल्याने भाजपा रागाने चवताळला आहे. म्हणूनच की काय, आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार किंवा अन्य कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचे धडे तुम्ही पाठ्यक्रमातून काढू शकाल. पण, लोकांच्या मनातून त्यांना कधीही काढता येणार नाही, असा प्रतिहल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या कार्यक्रमानंतर मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते. कर्नाटक सरकारने काल घेतलेले हे निर्णय तसेच धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्नच्या चर्चा करीत आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की, हाच तो कर्नाटक पॅटर्न आहे का? उद्धव ठाकरे ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, तेच आता वीर सावरकरांचा धडा काढायला निघाले, धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करतात, आता त्यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय? अल्पसंख्यकांच्या अनुनयाला तुमची मान्यता आहे का? खुर्चीसाठी याहीबाबतीत समझोता करणार, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.

दरम्यान, तुळजापूर येथे आई भवानीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची संधी मिळणे हा अभूतपूर्व योग असतो. आज आईचे दर्शन घेतले. हे शक्तीचे दैवत आहे. जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आमच्या सरकारला आईने शक्ती द्यावी तसेच आईचे निस्सीम भक्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना देशाचे नेतृत्त्व करताना अधिक शक्ती द्यावी, अशीही प्रार्थना आपण यावेळी केली. धाराशिवमध्ये रेल्वेचा प्रकल्प होतो आहे. मंदिर विकास आराखड्यासाठी राज्य आणि केंद्राकडून निधी देणार, यात्रा अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय घेणार, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी मान्यता यातून जिल्ह्याला मोठा लाभ मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा 

जबरा फॅन! ऋतुराजला भेटण्यासाठी चाहत्याची थेट मेदानात एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

समान नागरी कायद्यावर काय म्हणाले शरद पवार ?

‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल, चाहत्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात चित्रपटाचे स्वागत

धाराशिव लोकसभा बाबत धाराशिव लोकसभा
धाराशिव लोकसभा मतदारसंघात कोण लढणार, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीबाबत आमचे केंद्रीय बोर्ड निर्णय घेत असते. काही अडचणी आल्या तर मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय करु. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ज्या पक्षाला लढविण्याची गरज असेल तसा निर्णय आम्ही घेऊ.

विवेक कांबळे

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

2 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

2 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

2 hours ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

3 hours ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

3 hours ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

3 hours ago