महाराष्ट्र

धनंजय मुंडेंच्या ‘या’ निर्णयामुळे विद्यार्थांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी मिळणार मोठी मदत

टीम लय भारी

मुंबई :- धनंजय मुंडे यांनी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी मागील आठवड्यात निर्णय घेतला होता. तो निर्णय असा होता की, नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात अंशत बदल केला होता. त्या निर्णयामुळे या शिष्यवृत्ती योजनेचा कोटा २००३-०४ नंतर पहिल्यादांच १००% पूर्ण झाला आहे.

धनंजय मुंडे यांनी काय निर्णय घेतला?

अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव शिष्यवृत्तीचा लाभ नाकारल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे संधी देण्यात येईल असा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा

दरवर्षी ७५ विद्यार्याथ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी निवड समितीने अंतिम निवड केलेल्या ७५ पैकी ९ विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्तीचा लाभ नाकारल्याने ९ जागा रिक्त झाल्या होत्या. परंतु धनंजय मुंडे यांनी केलेल्या नव्या निर्णयामुळे या ९ जागी प्रतीक्षा यादीतील ९ विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, यामुळे सन २००३ -०४ नंतर प्रथमच या योजनेतील लाभार्थींचा कोटा १००% पूर्ण झाला आहे.

रिक्त जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारास संधी

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या जागतिक क्रमवारीतील ३०० पैकी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवलेल्या ७५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. जुन्या नियमानुसार अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्याने काही कारणास्तव ऐनवेळी लाभ नाकारला तर ती जागा रिक्त राहत असे, या रिक्त जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारास संधी देण्यात यावी याबाबतचा निर्णय धनंजय मुंडे यांनी नुकताच जाहीर केला होता.

दरम्यान प्रतीक्षा यादीतील ९ उमेदवारांना या योजनेतील नव्या नियमामुळे आता शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार असल्याचे शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले असून, यासाठी या विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले आहेत. तर धनंजय मुंडे यांनी देखील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Rasika Jadhav

Recent Posts

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

13 mins ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

3 hours ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

20 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

21 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

22 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

23 hours ago