महाराष्ट्र

धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला . ही घटना ताजी असतानाच धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला असून ही घटना 11 च्या सुमारास घडली आहे. या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडीचा ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटलेमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले आहेत.

शिरपूर तालुक्यातील पळासणेर येथील मध्यप्रदेश राज्याच्या बॉर्डरवर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून या ठिकाणी मदतकार्य सुरु आहे. अपघातात आधी पाच जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. कंटेनर हॉटलेमध्ये शिरल्याने अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर अनेक वाहने उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या घटनेमुळे हॉटेल पूर्ण उद्धवस्त झाले आहे.

हे सुध्दा वाचा:

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर

डॉ. अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा; शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट

राणादाचा शिंदे गटात प्रवेश, अनेक मराठी कलाकारही उपस्थित

आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 14 चाकी कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाल्याने या कंटेनरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडवलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु आहे.

रसिका येरम

Recent Posts

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

6 mins ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

43 mins ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

2 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

2 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

2 hours ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago