महाराष्ट्र

जनाची नाही, तर मनाची तरी आहे का मुख्यमंत्र्यांना? : नारायण राणे

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन केला होतो तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू केले होते. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लागू केला. १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु, त्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षाने लॉकडाऊनच्या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर निशाणा साधला. “राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले आहेत. ५९ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे राज्य सरकारचे पाप आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पाप आहे. मुख्यमंत्री फक्त बाधितांचे आणि मृतांचे आकडे जाहीर करतात. हे नाही-ते नाही सांगतात. जनाची नाही, तर मनाची तरी आहे का मुख्यमंत्र्यांना?” अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?

लॉकडाऊनसंदर्भात बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. “मुख्यमंत्री महोदय, या मुंबईत फक्त सव्वा लाख भिकारी आहेत. जरा आकडा मोजून घ्या. रस्त्यावर लोकंच नसतील तर भीक कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचे जेवण लागले, तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचे काम घटनेने राज्य सरकारला दिले आहे. जरा राज्यघटना वाचा. नुसते मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?” असे राणे म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांना जनाची नाही, तर मनाची आहे का?”

“काय करतात मुख्यमंत्री मातोश्रीवर बसून? एक-दोन दिवसांत मुंबईत हॉस्पिटल उभे करू शकत नाही? मुंबईत हवे ते करू शकतो माणूस. फक्त मृतांची संख्या, बाधितांची संख्या जाहीर करायची. हे कमी-ते कमी असे मुख्यमंत्री जाहीर करतात. जनाची नाही, मनाची तरी आहे का? कमी असेल तर ते उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री असतो. नुसते खुर्चीवर बसून चालत नाही. याला कर्तृत्व लागते. मुख्यमंत्री मास्क लावा, हे करा, ते करा असे सांगतात का? दीड हजार देतो हे सांगतायत. एखाद्या क्लर्क किंवा अधिकाऱ्याला सांगा जाहीर करायला. राज्य आर्थिक संकटात टाकायचे काम सुरू आहे”, असे देखील नारायण राणे म्हणाले आहेत.

“मुख्यमंत्री वारंवार धमकी देत होते”

“मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून मृतांची संख्या वाढतेय. राज्यात ५९ हजार रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. हे पाप राज्य सरकारचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आहे. देशात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ४१ टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्रात झाले आहेत. उपाय म्हणून मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्याची वारंवार धमकी देत होते. जणू महाराष्ट्र राज्य त्यांनी विकत घेतले आहे. दम देण्याचे काम राज्य सरकार करत होते. शेवटी त्यांनी लॉकडाऊन लागू केला. रिक्षावाल्यांना १५०० देणार. पण ५ माणसांचे कुटुंब १५०० रुपयांमध्ये उपजीविका करू शकणार आहे का?”, अशा शब्दांत राणेंनी निशाणा साधला.

“अजून किती सचिन वाझे आहेत ते बाहेर येईल”

दरम्यान, यावेळी बोलताना नारायण राणेंनी सचिन वाझे प्रकरणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला. “सचिन वाझे प्रकरण एक आहे. पण नजरेसमोर आलेले अजून किती सचिन वाझे आहेत जे यांच्या आदेशांनुसार चालत आहेत. यांना नको असलेली माणसे सचिन वाझेंसारख्या लोकांकडून मारण्याचे काम अजूनही सुरू आहे. एनआयएच्या चौकशीतून अजून बाहेर येईल. वाझे कुणाच्या सांगण्यावरून कुणाकुणाची अजून हत्या करणार होते ते बाहेर येईल. भयावह चालू आहे. हे लोकशाहीतले राज्य नसून ही हुकूमशाही सुरू आहे. फक्त पैसा कमावण्यासाठी एककलमी कार्यक्रम चालू आहे”, असे ते म्हणाले.

Rasika Jadhav

Recent Posts

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

54 mins ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

57 mins ago

सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल…

2 hours ago

नाशिकरोडमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी

भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक((BJP corporator) व पदाधिकारी कामगार नेता (office-bearers) यांच्या मध्ये दत्त…

2 hours ago

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

20 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

20 hours ago