डोंबिवलीतील स्फोटात आठ जणांचा मृत्यू, कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक

गुरुवारी डोंबिवलीतील अमुदान केमिकल्स या कंपनीमध्ये स्फोट (Dombivali blast) झाला होता. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणात आता पोलिसांनी कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक (owners of company arrested) केली आहे. दोन मृतदेहाची ओळख पटली आहे. आठही मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. डोंबिवली केमिकल रिअक्टर स्फोट (Dombivali blast) प्रकरणी अमुदान केमिकल्स कंपनीच्या मालकांना ठाणे गुन्हे शाखेने अटक (owners of company arrested) केली आहे. मलया मेहता आणि मालती मेहता अशी मालकांची नावे असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Dombivali blast kills eight, two owners of company arrested)

या प्रकरणी पुढील तपास आता ठाणे गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान मेहता यांची आई मालती मेहता यांनाही आज नाशिक इथून अटक करण्यात आली आहे.

8 जणांचा मृत्यू
डोंबिवलीतील एमआयडीसी हद्दीतील अमुदान केमिकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये गुरुवारी अचानक स्फोट (Dombivali blast) झाल्याने त्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 64 जण जखमी झाले आहेत. प्रदीप मेहता वय 38 वर्षे यास गुन्हे शाखेने आधीच ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना देखील गुन्हे शाखेने अटक (owners of company arrested) केली होती. त्यांना नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले होते. आता त्यांची चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस स्टेशन यांच्याकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मालती मेहता मुख्य आरोपी डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटानंतर आग लागली होती. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलांचे जवान दाखल झाले होते. ढिगाऱ्याखालून लोकांना काढण्यात आले. या प्रकरणात मालती मेहता या मुख्य आरोपी आहेत. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक आहेत.

अशा कंपन्या शहराबाहेर हव्यात – रामदास आठवले
केमिकल कंपन्या लोकांना धोका नाही अशा ठिकाणी असल्या पाहिजेत. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी अशा घातक कंपन्या स्थलांतरित करण्याचे मान्य केलं आहे. उद्योग मंत्रालयाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago