Coronavirus : मजूर कुटुंबातील चिमुकल्याने 10 हजार रुपये दिले मुख्यमंत्री निधीला

टीम लय भारी

बीड : ‘कोरोना’ ( Coronavirus ) आपत्तीचे उच्चाटन करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला अनेकांकडून मदत होत आहे. पण अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याने तब्बल १० हजार रुपये मुख्यमंत्री निधीस दिले आहेत. रेल्वेत मजुरी करणाऱ्या कुटुंबातील हा चिमुकला आहे. बक्षिसापोटी त्याला हे १० रुपये मिळाले होते. पण त्याने ही रक्कम ‘कोरोना’ ( Coronavirus ) आपत्ती निवारणासाठी दिले.

संविधान दीपक गडसिंग असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो तिसरीमध्ये शिकतो. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्याने आज या रकमेचा धनादेश दिला. ‘तुझ्या संविधान या नावातच सर्व काही आहे,’ अशा शब्दांत मुंडे यांनी या चिमुकल्याचे व त्याच्या कुटुंबियांचे कौतुक केले.

काही दिवसांपूर्वी चाटगाव येथील तलावात एका शाळकरी मुलीला पाण्यात बुडण्यापासून संविधानने मोठ्या हिमतीने वाचवले होते. त्यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून संविधानचे कौतुक झाले होते. अनेकांनी त्याचा सत्कार केला होता. त्याच्या या बहादुरीबद्दल अनेकांनी त्याला रोख बक्षीसही दिले होते. बक्षिसातून गोळा झालेली दहा हजार रुपये रक्कम संविधानने आज कोरोनाच्या ( Coronavirus ) संकटाशी सामना करत असलेल्या राज्य सरकारला देऊन त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी त्याने केली.

संविधानचे वडील दीपक गडसिंग हे बीड परळी रेल्वेमार्गावर मजुरी करतात. घरची परिस्थिती तशी नाजूकच. तरीही त्याने व त्याच्या कुटुंबाने दाखवलेले हे औदार्य वाखाणण्या जोगे व समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करणारे आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. यावेळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Covid19 : सुप्रिया सुळेंना लोक विचारताहेत, राजेश टोपे डॉक्टर आहेत का ?

MundeWithPawar : धनंजय मुंडेंच्या बीडला रोहित पवारांच्या बारामतीची मदत

कोरोनाचे ७७ हजार बळी

तुषार खरात

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

13 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

13 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

14 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

15 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

16 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

17 hours ago